परिणाम तर भोगावे लागतील ना...
"कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं" असं सांगत त्यांनी मोरे यांच्या पराभवावर भाष्य केलं. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी निवडणुकीवर भाष्य केलं. चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना..., असं वसंत मोरे पोस्ट करत म्हणाले आहेत. अखेरच्या ओळीत वसंत मोरे यांनी 'परिणाम तर भोगावे लागतील ना...', असं म्हटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
अखेरच्या टप्प्यात भाजपची मुसंडी
दरम्यान, या अटीतटीच्या लढतीत व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा 1100 मतांनी पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच या मतदारसंघात चुरस पाहायला मिळत होती, मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली. विजयानंतर माध्यमांशी बोलताना खोपडे यांनी आपल्या यशाचे श्रेय थेट मतदारांना दिलं. वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधताना खोपडे यांनी त्यांना कडक शब्दांत टोला लगावला.
दुसरीकडे, वसंत मोरेच्या लेकाचा घरच्या मैदानावर सपाटून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून विजय मिळवला आहे. रंजना टिळकर यांना 25859 मतं मिळाली. रंजना टिळकर आणि रुपेश मोरे यांच्यात तगडी फाईट पहायला मिळाली होती. मात्र, अखेरच्या काही मोजणीमध्ये रुपेश मोरे पिछाडीवर आल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत रुपेश मोरे यांना पराभवाचं तोंड पहायला लागलं आहे.
