- कमी होणारी संख्या: पूर्वीसारखे वासुदेव आता पहाटे येऊन "दान पावलं" म्हणत फिरताना दिसत नाहीत.
- कलेचा ऱ्हास: वासुदेवांची अलौकिक वेशभूषा, गाणी आणि नाचण्याची कला काळाच्या ओघात लोप पावत आहे.
- प्रोत्साहनाचा अभाव: काही वासुदेव अजूनही ही कला जपण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांना समाज आणि शासनाकडून पुरेसे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत नाही.
- गरज: जर त्यांना मदत मिळाली, तर ही परंपरा जिवंत राहू शकते आणि ही 'लोकपरंपरा' टिकवून ठेवता येईल.
advertisement
वासुदेवाचा पोशाख हा आकर्षणाचा विषय असतो. त्याचबरोबर सकाळी लोकांना जागे करायचे काम हे वासुदेव हे आध्यत्मिक प्रबोधन करून करतात. खरंतर ही संस्कृती टिकवली पाहिजे. पण दिवसेंदिवस ती लोप पावत आहे. पूर्वी गावागावात असणारे वासुदेव आता मात्र बोटावर मोजण्याइतके राहिले आहेत. असे असले तरी दरवर्षी वारी आणि आळंदी या ठिकाणी हे वासुदेव येऊन सेवा करत असतात. आळंदी यात्रा झाली की वासुदेव गावोवावी शहरात फिरतात.
थंडी आणि सकाळच वातावर या मध्ये वासुदेव आलारे वासुदेव आला असा गजर सुरू होतो. वासुदेव आपल्या गाण्यातून लोकांना जाग करतो. पूर्वी वासुदेव आला की त्याच आदर आतिथ्य व्हायचं आता मात्र वासूदेव वेशातील लोकांना मानसन्मान देत नाही. परंतु त्यांनी आज ही आपली परंपरा सोडली नाही.तुम्ही द्या अथवा नका देऊ आम्ही आमच काम करत राहू. संत परंपरेचे आम्ही हजार बाराशे वर्षापासून आलेली ही परंपरा आम्ही आहोत तो पर्यंत टिकून राहील असे यावेळी वासुदेव परंपरेतील तरुणाने म्हटले आहे.