TRENDING:

Wari 2024: पालखी सोहळ्यासाठी 'या' दिवशी दिवेघाट पूर्णपणे बंद

Last Updated:

आज विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले पाहिला मिळत आहे.तर तुकाराम महाराजांच्या पालखीत अंदाजे चार ते पाच लाख वारकरी चालणार आहेत. 400 दिंड्यांची नोंदणी यावर्षी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
advertisement

पुणे : देहूत जणू वैष्णवांचा मेळा पाहायला मिळाला. 29 जून रोजी याठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झाले. या सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तसंच अगदी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात वरुणराजाची साथ लाभली. त्यामुळे भक्तीमय रसात वारकरी अगदी न्हाऊन निघाले. महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा देहूच्या इनामदार वाड्यात असून 30 जून रोजी सकाळी 9 नंतर पालखीचं आकुर्डीच्या दिशेनं प्रस्थान होईल. पंढरीची ही वारी सुरळीत पार पडावी यासाठी ठिकठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

advertisement

2 जूनला हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार आहेत. त्यामुळे यावेळी दिवेघाट पूर्ण दिवसभर बंद राहील. महात्मा गांधी स्थानक इथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इथं जाण्यासाठी बससेवा देण्यात आलीये. हडपसर ते सासवडदरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सदर मार्गाची बस वाहतूक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाटमार्गे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर या ठिकाणहून 60 जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय.

advertisement

तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं त्या दिवसाचं नियोजन :

  • पहाटे 5 वाजता : श्री संत तुकाराम शिळा मंदिर इथं श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा पार पडली.
  • पहाटे 5:30 वाजता : तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा.
  • सकाळी 9 ते 11 वाजता : श्री संत तुकाराम महाराज पादूका पूजन, इनामदार वाडा.
  • सकाळी 10 ते 12 वाजता : पालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन.
  • advertisement

  • दुपारी 2 वाजता : पालखी प्रस्थान सोहळा, अश्व व दिंड्यांचं देऊळवाड्यात आगमन.
  • सायंकाळी 5 वाजता : पालखी प्रदक्षिणा.
  • सायंकाळी 6:30 वाजता : पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.
  • रात्री 9 वाजता : कीर्तन, जागर.

दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीत अंदाजे 4 ते 5 लाख वारकरी सहभागी होणार आहेत. सर्व वारकरी दरवर्षी आषाढी वारीत पायी पंढरपूरच्या वाटेवरून चालत असतात. यंदा 400 दिंड्यांची नोंद करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Wari 2024: पालखी सोहळ्यासाठी 'या' दिवशी दिवेघाट पूर्णपणे बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल