पुणे: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या राज्यात सर्वत उन्हाची तीव्रता वाढली असून किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर विदर्भातील नागपुरात मात्र काही प्रमाणात तापमानात घट झालीये. त्यामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. तर मुंबईचा पारा 35 अंशांच्या पारा गेला असून गेल्या काही वर्षांतील फेब्रुवारी महिन्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. पुढील 24 तासांत राज्यातील हवामान व तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झालीये. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. 8 फेब्रुवारीला मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश राहणार अशून काही दिवस तापमान स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या आधी हॉट होणार मुंबई, बाहेर पडण्याआधी एकदा पाहा टेम्परेचर
पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 8 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. नागपूर मधील तापमानात काहीशी घट झाल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. 8 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तर पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचे कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके राहील. 8 फेब्रुवारीला नाशिक मध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नाशिकच्या किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.