12 जानेवारीला पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून धुकं पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील किमान तापमान पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. सांगलीमध्ये पुढील काही दिवस ढगाळ आकाश कायम असणार आहे.
सोलापूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूर मध्ये अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुढील दोन दिवसांत सोलापूर मधील ढगाळ आकाश गायब होऊन निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये 12 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूर मधील देखील ढगाळ आकाश गायब होणार आहे.
काही प्रमुख शहरांमधील किमान तापमानात झालेली वाढ बघता राज्यातील इतर भागांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर 12 जानेवारीला ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे.