Road Safety Week: 5000 महिला तिच्याकडून शिकल्या BIKE चालवणं, 'बाई'कर गर्ल अमृताची अशीही 'रोड सेफ्टी' स्टोरी!

Last Updated:

  "आतापर्यंत आपण अनेक महिला दुचाकी चालवताना पाहिल्या आहेत, मात्र कुठेतरी प्रत्येक महिलेमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि...

+
5000

5000 पेक्षा जास्त महिलांना दिले दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण अशा प्रकारे करते जनजागृती

मुंबई : महिलांना उत्तमरित्या वाहन चालवता यावे आणि सुरक्षेची सर्व काळजी कशी घ्यावी, यासाठी एक मुंबईकर मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. अमृता माने असं या तरुणीचं नाव आहे.  'अमृता वुमन ऑन विल्स' या तिच्या ट्रेनिंग ग्रुपच्या अंतर्गत महिलांना दुचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देतं. सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वुमन ऑन विल्स या ग्रुपमधून अमृताने आतापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांना दुचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि रस्ते सुरक्षेची काळजी कशी घ्यायची याचे सुद्धा धडे दिले.
11 ते 17 जानेवारी 2025 म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. दरवर्षी एक आठवडा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जात आहे. रस्ते सुरक्षेबद्दल अमृता माने ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. बालपणीची रायडींगची आवड जपत अमृताने 21 व्या वर्षी फावल्या वेळेत रायडिंग शिकून घेतली. मात्र जेव्हा अमृताला दुचाकी चालवायची होती, तेव्हा तिला दुचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या महिला प्रशिक्षक यांची कमतरता जाणवली. हीच कमतरता समाजात प्रत्येक महिलेला कुठे ना कुठे जाणवत असेल, हाच विचार डोक्यात ठेवून अमृताने वुमन ऑन विल्स हा तिचा ग्रुप सुरू केला.
advertisement
"आतापर्यंत आपण अनेक महिला दुचाकी चालवताना पाहिल्या आहेत, मात्र कुठेतरी प्रत्येक महिलेमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि त्याचे मुख्य कारण असते ते म्हणजे तिला आजूबाजूचे सांगणारे लोकं. की, तू महिला असून वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे हीच चौकट कुठेतरी मोडायची होती म्हणून मी जास्तीत जास्त महिलांना दुचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देते' असं अमृताने लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
ती पुढे म्हणाली की, 'या प्रशिक्षणा अंतर्गत मी महिलांना नेहमी स्वतःची सुरक्षा आणि गाडी चालवताना रोडवर असतात त्यांची देखील सुरक्षा बाळगण्याचे धडे देते. उदाहरणार्थ जेव्हा आमच्या रायडींग ग्रुपमध्ये कोणतीही मुलगी किंवा महिला प्रवेश घेते तेव्हा आम्ही हेल्मेट अनिवार्य आहे, अशी अट त्यांच्यासमोर ठेवतो. जेणेकरून रोड सेफ्टीची सुरुवात इथूनच होते. याशिवाय आपण जेव्हा रोडवर गाडी चालवतो, तेव्हा आपल्या चारही बाजूला गाड्या असतात त्यामुळे चारही बाजूला योग्य पद्धतीने बघून आणि चौकस लक्ष ठेवून नेहमी गाडी चालवली पाहिजे, असं आम्ही आमच्या प्रशिक्षणात प्रत्येक महिलेला सांगतो"
advertisement
अमृताने सुरू केलेल्या वुमन ऑन विल्स या संकल्पनेनंतर अनेक महिलांचा दुचाकी चालवण्याचा आत्मविश्वास द्विगुणीत तर झालाच आहे, मात्र महिला या उत्तम चालक असतात तसंच त्या गाडी आणि स्वतःची सुरक्षा या दोन्ही गोष्टी अगदी नीटपणे सांभाळू शकता. याचं उदाहरण समाजासमोर उभं केलं आहे.
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH
#NitinGadkari
मराठी बातम्या/मुंबई/
Road Safety Week: 5000 महिला तिच्याकडून शिकल्या BIKE चालवणं, 'बाई'कर गर्ल अमृताची अशीही 'रोड सेफ्टी' स्टोरी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement