आज 17 फेब्रुवारी रोज सोमवारला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान गेले दोन दिवस स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. आज पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
सोलापूरचा शेतकरी पाण्यात पिकवतोय पैसा, शेततळ्यातून दुहेरी उत्पन्न, पाहा केलं काय?
साताऱ्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असू शकतं. साताऱ्यातील तापमान देखील स्थिर असल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यात आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
सांगलीमधील कमाल तापमानात गेले तीन दिवस सातत्याने वाढ होत आहे. सांगलीमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सांगलीमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीकरांना आता चांगलाच उकाडा जाणवणार आहे.
सांगलीसह सोलापूरमधील कमाल तापमानात देखील सतत वाढ होताना दिसून येत आहे. सोलापूरमधील कमाल तापमानात वाढ होऊन ते 38 अंशापर्यंत पोहचले आहे. तर तेथील किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. सांगली आणि सोलापूरमधील तापमानात तापमानात सातत्याने वाढ होत आली आहे. गेल्या दोन दिवसांत वाढ होऊन आज तापमान 38 अंशापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.