पुणे : राज्यात गेले काही दिवस थंडीचा जोर कमी असल्याचे बघायला मिळाले. राज्यात विविध शहरांतील किमान तापमानात वाढ झाल्याने सर्वत्र उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. पण, 20 जानेवारीला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये किमान तापमानात 3 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे.
advertisement
पुण्यामध्ये 20 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामधील किमान तापमानात काहीशी घट झाल्याने गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
वकिलीचं शिक्षण, पण आवड वेगळीच; सुरू केला स्वत:चा ब्रँड, सेलिब्रिटींचीही लागतेय रांग
सातारामध्ये निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील किमान तापमानात देखील घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी हलकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
सांगलीमध्ये 20 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. सांगलीमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीमधील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
सोलापूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमधील किमान तापमानात कोणताही बदल झालेला दिसून येत नाही.
कोल्हापूरमध्ये 20 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांतील किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणात अचानक बदल घडून आले आहेत. नागरिकांनी आरोग्याविषयी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.