महाविद्यालयात लेक्चर अन् मिळाली उमेदवारी
अवघ्या 22 वर्षांची सई ही या निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली होती. सई सध्या पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस महाविद्यालयात बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी तिला पक्षाकडून उमेदवारीचा फोन आला, त्यावेळी ती महाविद्यालयात लेक्चर घेत होती. एका सामान्य विद्यार्थिनीने थेट महापालिकेच्या रिंगणात उतरून मिळवलेला हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
ABVP मध्ये सक्रिय
सई थोपटे हिला विद्यार्थी चळवळीचा मोठा अनुभव असून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्न आणि शैक्षणिक आंदोलनांच्या माध्यमातून तिने आपली ओळख निर्माण केली होती. तिला तिच्या वडिलांचा, म्हणजे प्रशांत थोपटे यांचा राजकीय वारसा लाभला असून, आमदार माधुरी मिसाळ यांनी तिच्यावर टाकलेला विश्वास तिने सार्थ ठरवला आहे. सईच्या या विजयामुळे प्रभाग 36 मध्ये उत्साहाचे वातावरण असून, एका सुशिक्षित लोकप्रतिनिधीकडून आता विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
कोण आहे सई थोपटेचे वडील?
दरम्यान, सई थोपटे हिच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झालं तर तिचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. पर्वती, सहकारनगर, धनकवडी परिसरात भाजप पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशांत थोपटे यांनी केलंय. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी थोपटे कुटुंबीयांची भाजपशी असलेला संबंध आणि एकनिष्ठात पाहून सई थोपटे हिला पुणे महानगरपालिकेसाठी तिकीट दिलं, असल्याचं सांगितलं जात आहे.
