पुणे: पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ भारताबाहेर पळून गेला आहे. पासपोर्टमध्ये फेरफार करून घायवळ पळून गेल्यामुळे पोलीस आणि पासपोर्ट विभागातील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. पण, अशातच निलेश घायवळची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये तो एका व्यक्तीला बंगल्यावर येण्यासाठी धमकी देत आहे. शिवीगाळ आणि पुण्यातील काम बंद करण्याची धमकी घायवळने फोनवर दिली आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ याची वादग्रस्त ऑडिओ क्लिप समोर आली आहे. न्यूज१८ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवाळ याने पुण्यातील दिनेश मांगले नावाच्या व्यापाऱ्याला फोन केला होता. व्हॉटस्अपवर हा कॉल करण्यात आला होता.
या कॉलमध्ये निलेश घायवळ आणि दिनेश मांगले या दोघांमध्ये सावंत साहेबांचा उल्लेख केलेला आहे. सावंत साहेब काय माझामुळे मोठे झाले का? असा सवाल करत निलेश घायवळ याने “बंगल्यावर” येण्याची धमकी मांगलेंना दिली. या कॉलमध्ये दिनेश मांगले हे घायवळला आपण नातेवाईक असल्याचं सांगत आहे. पण, घायवळ याने बंगल्यावर ये, अशी धमकी वारंवार देत होता.
दिनेश मांगले आणि निलेश घायवळ यांच्यात काय बोलणं झालं?
निलेश घायवळ- किती वेळात येतोय तू,
मांगले - मला का दमदाटी करताय भाऊ.
घायवळ - तू मला इथं आला पाहिजे, नाहीतर उद्यापासून पुण्यातली दुकानदारी बंद करून टाकेन.
मांगले - भाऊ तुम्ही दमदाटी कशाला करताय, आपण गरिबीतून आलो आहोत
घायवळ - मी काही गरिबीतून आलो नाही, माझा बाप सावकार होता. तू इथं बंगल्यावर आला पाहिजे. तू ये लवकर
मांगले - भाऊ तुम्ही असं म्हणायले तर काय करायचं?
घायवळ - मग कशाला मस्ती पाहिजे, नितेश फक्त बंगल्यावर ये. तुला एवढी मस्ती कशाला, तुझ्यामुळे सावंत साहेब मोठा झाला आहे.
मांगले- ते मला म्हटले, निलेशसाहेबांची माणसं तुला उचलून नेतील.
निलेश घायवळ - तू बंगल्यावर ये, तुला सांगतो काय ते....तू फक्त सेल्फ मारून इकडं यायचं. नाहीतर उद्यापासून पुण्यातले सगळे धंदे तुझे बंद करून टाकेन.
मांगले - माझं काय चुकलं?
घायवळ - व्हय रे, मी बोललो काय तू चुकीचा आहे. ये x$%$#...x$%$# फक्त बंगल्यावर ये...x$%$#.. मोठ्या माणसाच्या नांदाला कशाला लागतोय. मी तुला बोलावलं तू यायचं असतं. सावंत साहेबांचा आपला काही विषय नाही. तू कशाला सावंत साहेबांना मध्ये घ्यायला. तू लय पुढची मारायला लागला. मी तुला एवढंच सांगितलं की बंगल्यावर ये.
मांगले - शिव्या देतात भाऊ तुम्ही आता, आता काय मारून टाकणार आहात का?
निलेश घायवळ - मग काय उपटून घेणार आहे, तुझ्यामध्ये हिंमत नाही ना, थांब मीच येतो तिथे..