पुणे : यंदाच्या वर्षी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. यामुळे सर्वच भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. अशातच पुण्याच्या उमेश गोडसे यांनी आपल्या खेळाडूंना एक सलाम म्हणून गणेशोत्सवानिमित्त वर्ल्डकपचा अनोखा देखावा बनवला आहे. कशा पद्धतीने हा देखावा तयार करण्यात आला आहे, याचबाबत घेतलेला हा एक आढावा.
उमेश गोडसे हे पुण्यातील एरंडवणे गावठाण भागातील रहिवासी आहेत. त्यांनी वर्ल्डकपचा हा सुंदर देखावा तयार केला. तर दरवर्षी ते नेहमीच वेगवेगळी थीम तयार करत असतात. परंतु यावर्षी वर्ल्डकपचा देखावा तयार करण्यात आला आहे आणि यामुळे अनेक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रियाही मिळत आहेत, अशी माहिती त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
तसेच पुढे ते म्हणाले की, ते एक क्रिकेटर असून कलाकारदेखील आहेत. प्रत्येक भारतीयांच्या लक्षात राहणारे जे काही क्षण आहे, त्यांची प्रतिमा घेऊन हा सुंदर अनोखा असा देखावा तयार केला आहे. ट्रॉफी जी आहे, ती माप घेऊन आखून सेम मूळ ट्रॉफीसारखी तयार केली आहे. ती तयार करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागला. तर बाकी कट आउट हे एक दिवसात तयार झाले, असे एकूण 3 दिवसात हा संपूर्ण देखावा तयार केला आहे.
प्रत्येक खेळाडू डोळ्यासमोर ठेऊन त्यांची तशी प्रतिमा तयार करून ते कट आउट लावले आहेत. त्यामुळे त्याच्यात एक जिवंतपणा जाणवत आहे, अशी माहितीही उमेश गोडसे यांनी यावेळी दिली. तर तुम्हालाही हा देखावा पाहायचा असेल, तर तुम्हीही हा देखावा पाहायला नक्कीच जाऊ शकतात.