पुणे : उद्या मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे आहे. हा फ्रेंडशिप डे देशभर साजरा केला जातो. यादिवस प्रत्येक जण आपल्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधत असतो. तुम्हीही फ्रेंडशिप डे साजरा करणार असाल आणि त्यासाठी एक अप्रतिम फ्रेंडशिप बँड शोधत असाल, तर तुम्ही घरच्या घरीच फ्रेंडशिप बँड बनवू शकता आणि आपल्या मित्रांना देऊ शकता. पुण्यातील उमा पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून आपल्या प्रियजनांसाठी फ्रेंडशिप बँड कसे बनवायचे याबाबत सांगितले. त्या म्हणाल्या की, घरातील लेस तसेच हेयरबँड यापासून तुम्ही हे बँड बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही रंगाची लेस, कात्री, डिंक, तसेच त्यावर चिटवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तू जसे ( टिकली, खडे, मोती इ.) घ्याव्यात.
यामध्ये सर्वप्रथम घेतलेली लेस मापात कापून त्याचे 3 भाग करून घ्यावेत. नंतर ती लेस एकमेकांमध्ये गुंतवून त्याचा पीळ घालून घ्यावा. योग्यरित्या पीळ घातल्यानंतर त्याला गाठ मारून घ्यावी. गाठी मारून झाल्यानंतर त्यावर उपलब्धतेनुसार खडे अथवा टिकल्या, मोती चिटकाव्यात. यानुसार तुम्ही तुमच्या कल्पतेने वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपल्या लहान मुलांना घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून बँड बनवायला शिकवू शकता.
तुमच्याकडे जपमाळेतील मोती असतील तर तुम्ही त्या मोत्यांसह एक सुंदर फ्रेंडशिप बँड बनवून तुमच्या मित्राला भेट देऊ शकता. गोलाकार, लवचिक किंवा रंगीबेरंगी लोकरीवर रंगीबेरंगी मणी, धागा आणि दोन्ही टोकांना गाठ बांधा. आता तुम्ही या बांगड्याप्रमाणे घालू शकता. तुमची इच्छा असल्यास, मण्यांनंतर थोडी लोकर मोकळी ठेवा, जेणेकरून तुम्ही ते तुमच्या मित्राच्या मनगटावर गाठ शैलीत बांधू शकता, अशी माहितीही पाटील यांनी दिली.