TRENDING:

Bangalore मधली नोकरी सोडली अन् घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या तरुणाची अनोखी गोष्ट

Last Updated:

मोहित हा मूळचा पुण्याचा त्याने फूड या क्षेत्रात मध्ये आपल शिक्षण पूर्ण करून बँगलोर या ठिकाणी  दोन वर्ष नोकरीं केली परंतु इथे त्याच मन रमल नाही यामुळे त्याने ती नोकरीं सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. पुण्यातील शनिवार वाडा शेजारी असलेल्या ठिकाणी त्याने स्नॉग सोडा शॉप सुरु केले यामाध्यमातून तो महिन्याला 35 ते 50 हजार रुपये कमवत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : व्यवसाय करणं हे अनेकांचे स्वप्न असतं. त्यामुळे अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून चांगला नफा मिळवत आहेत. अशातच एका तरुणाने बंगळुरू येथील चांगली नोकरी सोडून सोडा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता तरुण अगदी कमी जागेत म्हणजे 60 स्क्वेअर फूट जागेत हा व्यवसाय करत आहे.

advertisement

विशेष म्हणजे आता हा तरुण या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला चांगला नफा मिळवत आहे. पण त्याने हा व्यवसाय कसा सुरू केला, नोकरी सोडण्याचा विचार त्याच्या मनात नेमका कसा आला, याबाबत आपण जाणून घेऊयात.

मोहित टेके असे या तरुणाचे नाव आहे. मोहित मूळचा पुण्याचा आहे. त्याने फूड या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आणि बंगळुरू येथे दोन वर्षे नोकरी केली. मात्र, त्याठिकाणी त्याचे मन रमले नाही. यामुळे त्याने ती नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

पर्यटकांनी फुलले कोल्हापूर, एकाच दिवसात लाखो भाविकांनी घेतले अंबामातेचे दर्शन, photos

पुण्यातील शनिवार वाडा शेजारी असलेल्या ठिकाणी त्याने स्ट्राँग सोडा शॉप सुरू केले आहे आणि या माध्यमातून तो महिन्याला 35 ते 50 हजार रुपये कमावत आहे. यामध्ये सोड्याचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. लिंबू सरबत, मॉकटेल, फ्रेश सोडा असे सोड्याचे जवळजवळ 40 प्रकार तो तयार करत आहे. याची किंमत ही 20 रुपयापासून ते 50 रुपयांपर्यंत आहे.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, माझं शिक्षण हे बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे. लहानपणापासूनच बिझनेसची आवड होती व घरात आई वडिलांनाही व्यवसाय करताना पाहिलं होतं. मात्र, व्यवसाय करायचं म्हंटल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि ते नसल्यामुळे काही काळ बंगळुरू याठिकाणी मी नोकरी केली. मात्र, तिथे हवी तितकी प्रगती होईल, असे दिसत नव्हते. म्हणून मी पुन्हा पुण्याला शिफ्ट झालो.

advertisement

अंगणवाडी सेविकेच्या मुलाची कमाल, फक्त 10 वर्षात कमावली तब्बल 973 कोटींची संपत्ती, पण नेमकं कसं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

यानंतर याठिकाणी स्वतःचा स्नॉग सोडा नावाचा ब्रँड सुरू केला. जवळपास दोन महिन्यांपासून मी हा व्यवसाय करत आहे. यामध्ये 18 प्रकारचे सोडा आहेत. जसे की लिंबू, जलजिरा, पुदिना, कोकम, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, संत्री, सफरचंद, जिरा मसाला त्याचप्रमाणे मॉकटेल आणि फ्रेपे, सरबत असे एकूण 40 प्रकारचे सोडा पेय तयार केले जातात. यामधून चांगली कमाईसुद्धा होत आहे, अशी माहिती स्नॉग सोडा विक्रेते मोहित टेके या तरुणाने दिली.

मराठी बातम्या/पुणे/
Bangalore मधली नोकरी सोडली अन् घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या तरुणाची अनोखी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल