प्रिय अजितकाका...
युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा फोटो शेअर केला. प्रिय अजित काका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं, असं युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवार युगेंद्र पवारांसाठी प्रेरणास्थान होते.
मी सदैव प्रयत्न करीत राहीन....
advertisement
तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील, मिस यू अजितकाका...!, अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या विमान अपघातापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट चर्चेच्या प्रगत टप्प्यावर पोहोचले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर लगेचच विलीनीकरणाची घोषणा करण्याची योजना होती. अजितदादांची रणनीती अशी होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पूर्णपणे विलीनीकरणाची घोषणा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या मतपेढीला मजबूत करावे.
