TRENDING:

शेण, माती अन् बियांपासून विद्यार्थ्यांनी बनवले गणपती, पुण्यात या मराठी शाळेचा अनोखा उपक्रम, VIDEO

Last Updated:

या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षकांबरोबर पालकांनी मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचा अनुभव घेतला. मातीची गणेशमूर्तीच का वापरावी, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : भारतीय संस्कृतीमधे सण, उत्सव व परंपरेला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन व संवर्धन करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या सण, उत्सवातून पुण्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोर येथे होत असतो. नेमका काय आहे हा उपक्रम हेच आपण जाणून घेऊयात.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्हावा याकरिता या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीच्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा शाळेत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परिसरातील माती, वनस्पतीच्या बिया, गाईचे शेण वापरून व हळदीसारखे नैसर्गिक रंगांचा वापर करून गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेश मुर्ती बनविण्याचा आनंद घेतला.

advertisement

या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षकांबरोबर पालकांनी मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचा अनुभव घेतला. मातीची गणेशमूर्तीच का वापरावी, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. वर्षभर साठवलेल्या बिया, गायीचे शेण तसेच घरात नैसर्गिक रंग वापरून या गणेशमूर्ती बनवण्यात आल्या. या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुक करण्यात आले.

इको फ्रेंडली मखर घेऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव, ठाण्यात याठिकाणी फक्त 600 रुपयांपासून, व्हरायटीही भरपूर

advertisement

गेले दोन वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी स्वतः बनवलेली गणेश मूर्ती आपल्या घरात गणेश उत्सवात बसवली जाते. माती तयार करताना वनस्पती बिया यात मिसळण्यात आल्या. या बनवलेल्या गणपतींचे विसर्जन केल्यानंतर तुम्ही त्या कुंडीत रोपं तयार करून शेताच्या बांधावर रोपंदेखील लावू शकता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

विसर्जनानंतर तयार झालेली माती बाप्पाला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून बनविलेल्या सेंद्रीय खतात मिसळून विद्यार्थ्यांनीच बनवून जोपासलेल्या शाळेच्या परसबागेसाठी वापरण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. या उपक्रमाचे पुणे जिल्ह्यात चांगलेचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
शेण, माती अन् बियांपासून विद्यार्थ्यांनी बनवले गणपती, पुण्यात या मराठी शाळेचा अनोखा उपक्रम, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल