इको फ्रेंडली मखर घेऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव, ठाण्यात याठिकाणी फक्त 600 रुपयांपासून, व्हरायटीही भरपूर

Last Updated:

हे सगळे मखर बनवण्यात कार्डबोर्ड, फोर्म, पुठ्ठा या गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. या इको फ्रेंडली मखर मध्ये छोटे छोटे मखर सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपोआपच मन त्यांच्याकडे वळते.

+
पर्यावरणपूरक

पर्यावरणपूरक मखर ठाणे

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते आहे. सध्या अनेक जण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर अधिक भर देताना दिसत आहे. तुम्हालाही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर एक ठिकाण असे आहे, ज्याठिकाणी तुम्ही नक्की जायला हवे. हे ठिकाण नेमके कोणते आहे, याठिकाणी नेमक्या कोणत्या वस्तू आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
ठाणे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या ब्राह्मण सभागृह हॉल येथे श्री समर्थ इंटरप्राईजेस यांनी इको फ्रेंडली गणपतीचे मखर आणि इतरही इको फ्रेंडली शोभेच्या वस्तू यांचे प्रदर्शन भरवले आहे. इथे येणाऱ्या सगळ्यांना सुंदर सुंदर इको फ्रेंडली मखर खरेदी करता येणार आहेत. यांची किंमत सुद्धा फक्त 600 रुपयांपासून सुरू आहे.
advertisement
हे सगळे मखर बनवण्यात कार्डबोर्ड, फोर्म, पुठ्ठा या गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. या इको फ्रेंडली मखर मध्ये छोटे छोटे मखर सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपोआपच मन त्यांच्याकडे वळते. यंदा श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडे मखरांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी उपलब्ध आहे. यामध्ये श्रीरामांच्या अयोध्येची प्रतिकृती असणारे मखर, पंढरपुराचे प्रतिकृती असणारे मखर, श्री स्वामी समर्थांच्या झाडाचे प्रतिकृती असणारे मखर, मंदिरातले मखर असे अनेक मखर उपलब्ध आहेत.
advertisement
गुजरातच्या गवतामुळे वाढले दुधाचे उत्पन्न, सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला दीड लाख रुपये, VIDEO
'आम्ही मागील पंधरा वर्षांपासून हा इको फ्रेंडली मखरांचा व्यवसाय करत आहोत. आमच्या मखरांमध्ये निसर्गाला हानी पोहोचेल अशा कोणत्याच गोष्टींचा वापर केला जात नाही. यावर्षी सुद्धा आमच्या मखरांमध्ये खूप व्हरायटी आहे. निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याची आम्ही नेहमीच काळजी घेतो. ठाणेकरांनी सुद्धा यंदाचा गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेऊन साजरा करावा हीच इच्छा आहे, म्हणूनच या वर्षी आम्ही ठाण्यात प्रदर्शन भरवले आहे', असे श्री समर्थ इंटरप्राईजेसचे मखर विक्रेते नवनाथ जगताप यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही यंदाचा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करायचा असेल, तर या इको फ्रेंडली मखर सजावटीच्या प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि तुम्हाला आवडणारा, हवा असणारा सुंदर मखर खरेदी करू शकता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
इको फ्रेंडली मखर घेऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव, ठाण्यात याठिकाणी फक्त 600 रुपयांपासून, व्हरायटीही भरपूर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement