झाँसी : स्वतःचं घर असावं, असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला काढत असतो. घरांचे, जमिनीचे दर लाखोंच्या पार गेले तरीही लोक मोठ्या हौशीने मालमत्ता खरेदी करतात. परंतु ही खरेदी अत्यंत सतर्कतेने करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण एकाच व्यक्तीने एक मालमत्ता अनेक लोकांना विकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. शिवाय जी जमीन विकत घेतली त्यावर आधीच कर्ज होतं आणि खरेदीदार फसला, त्याला आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली, अशाही बातम्या तुम्ही वाचल्यास असतील.
advertisement
अशी फसवणूक आपल्यासोबत होऊ नये यासाठी कोणतीही गुंतवणूक, खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या. याबाबत उत्तर प्रदेशच्या झाँसी भागातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) अरुण कुमार सिंह यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
...याच्यापुढे मालदीव आणि लक्षद्वीपपण फिकं! डोळे दिपवणारं सौंदर्य, म्हणतात 100 बेटांचं शहर
अरुण कुमार सिंह यांनी सांगितलं की, कोणतीही जागा खरेदी करण्यापूर्वी तिच्याविषयी पूर्ण माहिती मिळवा. ज्या गावात जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवा सातबारा काढून घ्या. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासा. सातबाऱ्यावरील नावं ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहेत ना हे लक्षपूर्वक पाहा. जमिनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज काढलेलं नाही ना, याचीही खात्री करून घ्या. जमिनीवर कोणता न्यायालयीन खटला सुरू आहे का, हेसुद्धा तपासा. भविष्यात त्या जमिनीतून नियोजित मार्गाची उताऱ्यावर नोंद नाही ना, याची खात्री करा. जमिनीचे कमीत कमी 12 वर्षांचे सातबारा आणि फेरफार उतारे पाहा. त्यामुळे तिच्या मालकी हक्कात वेळोवेळी काय बदल झाले, हे लक्षात येईल. तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात जमिनीच्या इतिहासाशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
तिजोरी कायम भरलेली हवी? मग 'ही' झाडं लावा 'याच' दिशेत
सातबारा उतारा मिळाल्यानंतर ती जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे पाहा. ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणंही आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीची हद्द कळते. शिवाय त्या जमिनीवर शेतरस्ता नाही ना, हेदेखील पाहावं. त्या जमिनीबाबत कोणाचीही काही हरकत नाही, याची खात्री झाली की, नंतरच जमीन खरेदी करा.
व्यवहाराची केवळ नोंद पुरेशी नाही!
कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिची तहसीलमध्ये नोंद केली म्हणजे आपण तिचे मालक झालो असं नाही. नोंदणीनंतर मालमत्तेचे मालक होण्यासाठी आणखी एका ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे. दुकान, घर किंवा जमीन खरेदी केल्यानंतर आपण विक्रेत्याला पूर्ण रक्कम देतो. या व्यवहाराची नोंदणी केल्यानंतरही आपण त्या मालमत्तेचे मालक होत नाही, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नोंदणीनंतर म्यूटेशन करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
नोंदणी हा केवळ मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज असतो, मालकीचा नाही. त्यामुळे मालमत्तेची नोंदणी झाल्यावर तातडीने त्या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन करून घ्या. तेव्हा तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक व्हाल.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g