...याच्यापुढे मालदीव आणि लक्षद्वीपपण फिकं! डोळे दिपवणारं सौंदर्य, म्हणतात 100 बेटांचं शहर

Last Updated:
समुद्री पर्यटनासाठी भारतात मालदीवपेक्षाही अतिशय सुंदर बेट आहेत हे लक्षद्वीपवरून आपल्या लक्षात आलंच असेल. अशाच एका नैसर्गिक सौंदर्याने संपन्न पर्यटनस्थळाविषयी आपण जाणून घेणार आहोत. जिथं प्रचंड पाऊस पडल्याने वर्षभर हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात राहतं येतं आणि गार वारा अनुभवता येतो.
1/5
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि या आकर्षक बेटांची संपूर्ण जगात चर्चा झाली. लक्षद्वीपची तुलना थेट मालदीवशी करण्यात आली, जिथं दरवर्षी लाखो रुपये खर्चून देश-विदेशातील पर्यटक निवांत वातावरण अनुभवायला जातात. परंतु आपल्या भारतातही अशी अनेक पर्यटनस्थळं आहेत जिथं भेट दिल्यावर आपल्याला अगदी स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद मिळेल. अशाच एका शहराची ही माहिती आहे. जे राजस्थान राज्यात तब्बल 100 बेटांवर वसलंय.

advertisement
2/5
राजस्थानच्या 'बांसवाडा' भागाची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. त्याचं कारणच आहे तिथलं सौंदर्य. खरंतर राजस्थान म्हटलं की, डोळ्यासमोर येतो दूरदूरवर पसरलेला अखंड वाळवंट. अशा या वाळवंटी भागात असलेल्या बांसवाडात मात्र वर्षाचे बाराही महिने दाट हिरवळ असते. इथं बेटांच्या रूपात लहान लहान गावं वसलेली आहेत.

3/5
या बेटांमुळे जिल्हा पर्यटन प्रशासनासाठी विकासाचे अनेक मार्ग खुले होतील. त्यासाठी पर्यटन विभागाकडून तयारीही सुरू करण्यात आली आहे. बांसवाडाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पर्यटन विभागाकडून वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतात. जेणेकरून जगभरातील पर्यटकांना या सुंदर भागाविषयी कळावं.

4/5
बांसवाडाच्या शेजारी आहे माही नदी. नदीमुळेच बांसवाडा 100पेक्षा जास्त लहान मोठ्या भागांमध्ये विभागला आहे. शिवाय नदीमुळेच हा भाग प्रचंड निसर्गसंपन्न दिसतो. इथं पाऊसही भरपूर होतो. परिणामी इथले लोक सुदृढ आयुष्य जगतात.

5/5
राजस्थान राज्यात सर्वाधिक पाऊस बांसवाडामध्ये होते. त्यामुळे तिथलं वातावरण कायम थंड असतं. राजस्थानात वाळवंटामुळे प्रचंड उकडतं. परंतु आपण बांसवाडात गेलात तर वाळवंटी प्रदेशात असल्यासारखं अजिबात जाणवणार नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement