वैदिक विचारसरणीनुसार, आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक लहानसहान घटनांमागेही एक विशिष्ट संकेत दडलेला असतो. या घटनांमध्ये जेवणात केस सापडणे हीसुद्धा एक चेतावणी मानली जाते. कारण ही कृती वारंवार घडत असेल, तर ती सहज दुर्लक्षित करण्यासारखी नाही. विशेषतः शनीच्या साडेसाती किंवा शनी महादशेच्या काळात अशा घटनांची शक्यता अधिक वाढते.
advertisement
शनीचे संकेत
शनीदेव, ज्यांना कर्माचा देव मानले जाते, ते थेट शिक्षा न देता सूचक पद्धतीने जीवनातल्या चुका आणि अनास्थेची जाणीव करून देतात. जेवणात केस सापडणे हे त्यांच्या अशाच चेतावणींपैकी एक मानले जाते. शनी हे अशा लहान घटनांमधून मोठ्या समस्यांची चाहूल देतात. काही वेळेस वस्तू हरवणं, उशीर होणं किंवा वारंवार अपयश येणं – हे सर्व सूचक संकेत असू शकतात.
जर ताटात वारंवार केस सापडत असेल, तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही जीवनात कुठेतरी चुकीच्या गोष्टींना महत्त्व देता आहात किंवा नकारात्मक सवयींचा साखळदंड तयार करत आहात. या घटनांचा बारकाईने विचार करून जीवनशैलीत सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.
शनी देवाचे तीन महत्वाचे संकेत
जुने कर्म सुधारण्याची वेळ: तुम्ही केलेल्या पूर्वीच्या कर्मांकडे परत पाहा आणि अजूनही मार्गी लावता येतील, अशा गोष्टींची दखल घ्या.
नकारात्मक साखळी तोडण्याची गरज: सतत घडणाऱ्या त्रासदायक घटनांमागे एखादी सवय, व्यक्ती किंवा भावना कारणीभूत असू शकते. तिचा विचार करा.
कशाला महत्त्व देता आहात याचा विचार करा: फक्त जेवणापुरतं नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात तुम्ही कोणत्या गोष्टींना महत्त्व देता, त्यावर पुनर्विचार करा.
ज्योतिषशास्त्र नुसार, जेवणात केस सापडणं ही फक्त अस्वच्छतेची बाब नसून ती तुमच्या जीवनशैलीतील दोष, अनास्था किंवा चुकीच्या कर्मांची चाहूल असू शकते. सनातन धर्मात अशा छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्या आपल्या आध्यात्मिक आणि वैयक्तिक सुधारणेसाठी वापरण्याची परंपरा आहे. त्यामुळे अशा संकेतांकडे गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घेणं हेच शहाणपण ठरेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)