अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहांनी आपली चाल बदलली की, त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. मग काही राशींच्या व्यक्तींसाठी हा परिणाम शुभ असतो, तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. एका ठराविक वेळेनंतर सर्व ग्रहांचं राशीपरिवर्तन होतं. सूर्यापासून केतूपर्यंत प्रत्येक ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा कालावधी वेगवेगळा असतो.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 7 मार्चला ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. जिथे आधीपासूनच राहू विराजमान आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा त्यांची युती होते. म्हणजे अर्थातच मीन राशीत राहू आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. विशेष म्हणजे जवळपास 18 वर्षांनंतर या ग्रहांच्या युतीचा योग आला आहे. त्यामुळे त्यांच्या या स्थितीचा ज्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल त्यांचं भाग्य उजळून निघेल, हे निश्चित. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया. यापूर्वी 2006 साली मीन राशीत राहू आणि बुध ग्रहाची युती झाली होती. त्यानंतर आता हा सुखद योग जुळून आला आहे.
शनीसोबत 4 मोठे ग्रह चाल बदलणार! मार्चमध्ये 'या' राशींचं नशीब पार उजळून निघणार
वृश्चिक : आपल्यासाठी राहू आणि बुध ग्रहाची युती लाभदायी ठरणार आहे. आपल्याला शुभवार्ता मिळतील. ऑफिसमध्ये सहकारी आणि वरिष्ठांची चांगली साथ मिळेल. आपला मान-सन्मान वाढेल, आपपसांत प्रेम वाढेल, दाम्पत्य जीवनात सुख येईल.
कर्क : आपल्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असेल. कामात यश मिळेल, उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी मिळेल. कामकाजात वृद्धी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता आपल्याला मिळतील. धार्मिक प्रवास होऊ शकतो.
वृषभ : आपल्यासाठी बुध आणि राहूची यूती शुभ ठरेल. त्यातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. करियरमध्ये प्रगती होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
