अयोध्या : कृष्णाला प्रेमाचं प्रतीक मानतात. त्यामुळे कृष्णाचा आशीर्वाद म्हणजे आयुष्यात प्रेमाचा बहर. ज्या व्यक्तीला साक्षात कृष्ण देवता प्रसन्न होते तिची सुख-समृद्धीनं भरभराट होते, असं म्हणतात. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीला अत्यंत मनोभावे पूजा केली जाते.
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. या दिवशी कृष्णाची मनोभावे पूजा केल्यास, त्याला आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. जन्माष्टमीला कृष्णाला अत्यंत सुंदर वस्त्र परिधान करून सुरेख असा शृंगार केला जातो. जर आपण राशीनुसार बाळकृष्णाला सजवलं तर ही जन्माष्टमी आपल्यासाठी खरोखर लाभदायी ठरू शकते, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
- मेष : आपण श्रीकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- वृषभ : आपण श्रीकृष्णाला चांदीच्या दागिन्यांनी शृंगार करावा.
- मिथुन : आपण श्रीकृष्णाला रेषांच्या डिझाईनचे वस्त्र परिधान करावे.
- कर्क : आपण श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- सिंह : आपण श्रीकृष्णाला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- कन्या : आपण श्रीकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- तूळ : आपण श्रीकृष्णाला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- वृश्चिक : आपण श्रीकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- धनू : आपण श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- मकर : आपण श्रीकृष्णाला पिवळ्या आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- कुंभ : आपण श्रीकृष्णाला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
- मीन : आपण श्रीकृष्णाला तांबूस रंगाचे वस्त्र परिधान करावे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.