उज्जैनच्या आचार्यांनुसार माघ महिन्याचा महिमा
आचार्यांच्या मते, "माघ मकरगत रबि जब होई, तीरतपतिहिं आव सब कोई" म्हणजेच जेव्हा सूर्य मकर राशीत असतो, तेव्हा सर्व देवता आणि पवित्र नद्या प्रयागराजमध्ये एकत्र येतात. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. ज्यांना नद्यांवर जाणे शक्य नाही, त्यांनी घरातच पाण्यात गंगाजल टाकून सूर्योदयापूर्वी स्नान करावे.
advertisement
महिनाभर विसरूनही खाऊ नका 'ही' गोष्ट
शास्त्रानुसार आणि उज्जैनच्या विद्वानांच्या मते, माघ महिन्यात 'मुळा' खाणे वर्ज्य मानले गेले आहे. पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, माघ महिन्यात मुळ्याचे सेवन करणे हे मद्यपानासारखे मानले जाते. जो व्यक्ती या महिन्यात मुळा खातो, त्याच्या हातून घडलेल्या पुण्याचा ऱ्हास होतो आणि पापे वाढतात.
हा काळ थंडीचा आणि ऋतू परिवर्तनाचा असतो. आयुर्वेदानुसार या काळात मुळा खाल्ल्याने शरीरात कफ आणि पित्ताचा दोष निर्माण होऊ शकतो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.
माघ महिन्यात 'हे' काम कधीही करू नका
या महिन्यात 'मौन' आणि 'संयमा'ला महत्त्व आहे. कोणाचेही मन दुखावेल असे बोलू नका, कोणाची निंदा करू नका. माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करणे पुण्यदायी असते. उशिरा उठल्याने शरीरातील तेज कमी होते आणि दारिद्र्य येते. या संपूर्ण महिन्यात मांस, मदिरा आणि लसूण-कांद्याचा त्याग करावा. सात्त्विक आहार घेतल्यानेच पूजेचे पूर्ण फळ मिळते. माघ हा दानाचा महिना आहे. तुमच्या दारात कोणी गरजू आला, तर त्याला धान्य किंवा वस्त्र नक्की द्या.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
