नर्मदापुरम : ज्योतिषशास्त्रात रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवांच्या अश्रूंमधून त्याची उत्पत्ती झाली होती, असं मानलं जातं. त्यामुळे रुद्राक्ष परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सदैव ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा आशीर्वाद असतो, अशीही मान्यता आहे. रुद्राक्ष 1 ते 14 मुखी असतात, त्यापैकी प्रत्येक रुद्राक्षाला स्वतंत्र महत्त्व आहे.
खरंतर रुद्राक्ष म्हणजे झाडावर उगवणारं एक सुकलेलं फळ. ज्योतिषी पंकज पाठक सांगतात की, रुद्राक्ष परिधान केल्यास आयुष्यातल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात. परंतु जर ते योग्य पद्धतीने परिधान केलं तरच. शिवाय रुद्राक्ष घातलेल्या व्यक्तीने काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. काहीजण रुद्राक्षाची माळ परिधान करतात, तर काहीजण ते मनगटात घालतात.
advertisement
(पहिलं चंद्रग्रहण! दिसणार नाही, पण जाणवेल, ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींनी जरा जपून)
नेमकं कधी परिधान करावं रुद्राक्ष?
अमावस्या, पौर्णिमा, श्रावणी सोमवार आणि शिवरात्र यापैकी कोणत्याही दिवशी रुद्राक्ष परिधान करणं शुभ मानलं जातं. परंतु परिधान करण्यापूर्वी रुद्राक्ष दुधाने किंवा मोहरीच्या तेलाने छान स्वच्छ करावं. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपण रुद्राक्ष परिधान करू शकता. ज्योतिषांकडून ते घालून घेतलं तर उत्तम.
(राहू-सूर्याची युती, 25 वर्षांनी खतरनाक योग! 3 राशींच्या व्यक्तींनी जरा साभांळून)
रुद्राक्ष परिधान केल्यानंतरचे नियम
रुद्राक्षामुळे आपलं आयुष्य सुखी होतं, हे खरं आहे. परंतु त्यासाठी काही नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. जसं की, रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढून ठेवा, कधीच ते परिधान करून झोपू नये. रुद्राक्ष घालून कधीच स्मशानभूमीत किंवा जिथे लोकांवर अंत्यसंस्कार होतात, त्यांना दफन केलं जातं अशा ठिकाणी जाऊ नये. शिवाय एकदा रुद्राक्ष परिधान केलं की, मांसाहार पूर्णपणे सोडावा. तसंच कोणतंही व्यसन करू नये.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
