सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेत भाकणूक प्रथेला महत्त्व आहे. येणाऱ्या वर्षात वातावरणाची दिशा कशी असणार आहे, हवामान, कोणत्या वस्तू महागणार याचा भविष्य यातून सांगितले जाते. होम विधीचा सोहळा आटोपल्यावर दिवसभर उपाशी पोटी ठेवलेल्या वासराला निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूकस्थळी आणले जाते. त्या वासराची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर अंथरलेल्या घोंगडीवर विविध प्रकारचे धान्य, खोबरे, गाजर, बोर, गूळ, ऊस आणि पाने इत्यादी खाद्य वस्तू ठेवण्यात येतात.
advertisement
अशी आहे यंदाच्या वर्षाची भाकणूक
यंदाच्या वर्षी वासराणे गूळ खाल्ला असून लाल वस्तू महागणार आहेत. 2026 मध्ये सुद्धा मागील वर्षीच्या प्रमाणाप्रमाणे पाऊस होणार आहे. यंदाच्या वर्षी वासरू चलबिचल होते. आल्यापासून वासरू एका ठिकाणी उभे राहत नव्हते. त्यामुळे हा भविष्यकाळ सांगता येत नसल्याचे मत राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे भाकणूकस्थळी वासरू आल्यावर ओरडले, त्यामुळे त्याचे संकेत देखील सांगता येणार नसल्याचे मानकरी हिरेहब्बू यांनी सांगितले, अशी भाकणूक यावेळी करण्यात आली.
टीप - सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक येणारे भविष्य वर्तवण्याची पारंपरिक परंपरा आहे. या भाकणुकीला यात्रेला येणाऱ्या हजारो भाविकांचा विश्वास आहे. हा भाविकांचा श्रद्धेचा विषय असून NEWS 18 LOCAL या भाकणुकीचे फक्त वृत्त संकलन करत आहे. या भाकणुकीचे कोणत्याही प्रकारे समर्थन, सहमत किंवा या भाकणुकीच्या सत्यतेचा दावा करत नाही.





