वाराणसी : लग्न एक पवित्र नाते आहे. या पवित्र नात्यामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नानंतर नवविवाहित तरुणी ही आपल्या माहेरी जाते. त्यानंतर सासरी परत येते. मात्र, काही महिने असे आहेत, ज्या महिन्यांमध्ये नवविवाहित तरुणीने आपल्या माहेरी जाण्यापासून टाळायला हवे. जर चुकूनही ती नवविवाहित तरुणी माहेरी गेली तर तिच्या वडिलांचे नुकसान होऊ शकते. मुहूर्त चिंतामणि आणि मुहूर्त मार्तण्ड धर्म ग्रंथात याबाबत सविस्तर असा उल्लेख आढळतो.
advertisement
काशीचे ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लग्नाच्या आधी नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यामुळे सासरी आणि माहेरी दोघांवर येणारे संकट टळू शकते.
कोणत्या महिन्यात माहेरी जाऊ नये -
पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्राशी संबंधित मुहूर्त मार्तण्ड यानुसार, विवाहानंतर पहिल्या चैत्र महिन्यात नवविवाहितेने आपल्या माहेरी राहू नये. यामुळे तिच्या वडिलांना नुकसान होऊ शकते. हे नुकसान अनेक प्रकारचे असू शकते. तसेच जर चैत्र महिन्यात नवविवाहित तरुणी ही सासरहून माहेरी आली तर तिच्या वडिलांना मानसिक आणि शारीरिक कष्ट होऊ शकतात. याशिवाय त्यांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
देशभर त्यांचे भक्त, मोठमोठे मंत्रीही दरबारात लावतात हजेरी! कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा?
इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातही वाद होऊ शकतात. म्हणून नवविवाहित तरुणीने लग्नानंतर पहिल्या वर्षी येणाऱ्या चैत्र महिन्यात आपले माहेरी चुकूनही जाऊ नये.
लग्न जुळत नाहीये म्हणून येतंय टेन्शन, पण आता चिंता नको, फक्त या गोष्टी करा फॉलो, मग पाहा फायदा
विवाह मार्तंडमध्ये आहे या नियमांची चर्चा -
पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, तसेच तर चैत्र महिना देवी उपासनेसाठी खूप शुभ आहे. या महिन्यात शक्तिची आराधना केली जाते. मात्र, या महिन्यासाठी विवाह मार्तंडमध्ये नवविवाहित तरुणीसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.
सूचना - ही बातमी ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादानंतर लिहिली गेली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
