लग्न जुळत नाहीये म्हणून येतंय टेन्शन, पण आता चिंता नको, फक्त या गोष्टी करा फॉलो, मग पाहा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जर तुमच्या लग्न ठरण्यात काही अडचणी येत असतील किंवा लग्न जुळूनही ते काही गोष्टींमुळे मोडले गेले असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमची कुंडली एखाद्या ज्योतिषाचार्याला दाखवायला हवी. कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही लग्नासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
advertisement
लग्नाआधी प्रत्येकाला वाटते की, त्याला मनासारखा जोडीदार मिळावा. लग्नाआधी अनेक मुली उपवास करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे 16 सोमवार उपवास हे विशेष असतात. ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, जी तरुणी नियमानुसार, हे उपवास पूर्ण करते, तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो. याशिवाय भगवान शंकराची पूजा करुन वडाच्या झाडाच्या 108 परिक्रमा केल्यानेही आवडीचा जोडीदार मिळतो.
advertisement
advertisement
advertisement
विवाहात येत असलेल्या समस्या दूर करण्यसाठी गुरुवारचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून एखाद्या पवित्र नदी किंवा पाण्याने स्नान करुन पिवळे वस्त्र धारण करावे. यानंतर पिंपळ पिंपळ किंवा आजूबाजूच्या वडाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याशिवाय रात्रीच्या वेळी एक कापड घ्यावा आणि त्यामध्ये हळदीची गाठी बांधून आपल्या उशाखाली ठेवाव्या. असे केल्याने लग्नातील अडचणी दूर होतात आणि लग्नाचा योग तयार होतो, असेही त्यांनी सांगितले.
advertisement


