संन्यासी जीवन जगणं सोपं नाहीये. 'संन्यास' हा शब्दच खूप कठीण आहे आणि त्याप्रमाणे जगणे म्हणजे तुम्ही सर्व सुखे सोडून देता आणि सर्व सांसारिक इच्छांपासून दूर होऊन केवळ भगवंताच्या भक्तीत स्वतःला लीन करता. याशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. आजकाल याच्या अगदी उलट चित्र दिसतंय की, जे लोक स्वतःला संन्यासी म्हणतात, ते सर्व सुखे आणि ऐषारामाचं जीवन जगत आहेत. पण ही संन्यासाची खरी व्याख्या नाहीये.
advertisement
गृहस्थ जीवन आणि संन्यास
आपले धर्मग्रंथ मानतात की, या कलियुगात काही गोष्टींना 'वर्जित' म्हणजे मनाई करण्यात आली आहे, ज्यापैकी एक संन्यास आहे. मात्र, गृहस्थ संन्यासाविषयी बोलायचं झाल्यास प्रश्न येतो की संन्यासी कसं बनायचं, तर यावर उत्तर आहे की तुम्ही घर सोडून वेगळ्या मार्गावर जाणे.
दररोज कराव्या लागतील या गोष्टी
तरीसुद्धा, गृहस्थ जीवनात संन्यासी होण्यावर उत्तर 'हो' असंच असेल. यासाठी व्यक्तीला आपलं जीवन अध्यात्माकडे वळवावं लागतं. गृहस्थ जीवनात राहूनही आध्यात्मिक जीवन जगता येतं. घरात राहूनही संन्यासी बनता येतं. यासाठी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून योगाभ्यास करणे, गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालणे, मनाला आतून जागृत करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात.
सुखांचा त्याग करावा अन् पूजा-पाठ करावे
संन्यासी जीवनात ही कामे सर्वात महत्त्वाची मानली जातात. तुम्हाला अनेक अशी कामे करावी लागतात जी सामान्य लोक करत नाहीत आणि तुम्हाला तुमची जीवनशैली सामान्य लोकांसारखी न ठेवता सुखांचा त्याग करावा लागतो. सकाळी उठणे, स्नान करणे, पूजा-पाठ करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे, लोकांना जागरूक करणे, त्यांना धर्माकडे पुढे घेऊन जाणे, इतरांना ज्ञान देणे, या सर्व गोष्टींचे वर्णन केले आहे.
भक्तीच्या मार्गावर लीन होणं म्हणजे सन्यास
शास्त्रीजी राम कुमार झा म्हणतात की, असंही म्हटलं जातं की कलियुगात आपल्या गृहस्थ जीवनाला 16 संस्कारांमध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि याचा त्याग करणं हे शास्त्रांचं उल्लंघन देखील आहे. तुम्ही सत्यमार्गावर राहून, भगवंताच्या भक्तीत लीन होऊन देखील पुढे जाऊ शकता, ज्याला एक प्रकारचा संन्यासच मानला जातो. ही आपली श्रद्धा आहे, पण वेगवेगळ्या लोकांचे मत वेगवेगळे असू शकते.
हे ही वाचा : स्त्रियांनी 'ओम' का म्हणू नये? शास्त्र काय सांगतं? पंडितजींनी सांगितलं त्यामागचं नेमकं सत्य
हे ही वाचा : 84 लाख योनी म्हणजे काय? मनुष्य जन्म कधी मिळतो? पद्म पुरणात दडलंय यामागचं रहस्य, वाचा सविस्तर...