TRENDING:

Ashadhi Wari 2025: 307 किमी, 3000 सायकली अन् रिंगण, अशीही वारी, एकदा हा व्हिडीओ पाहाच

Last Updated:

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरहून शेकडो भाविकांनी सायकलवारी सुरू केली आहे. या सायकलवारीचे चौथे वर्ष असून, यामध्ये महिला, पुरुष आणि बालकांसह विविध वयोगटांतील भाविक उत्साहात सहभागी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरहून शेकडो भाविकांनी सायकलवारी सुरू केली आहे. या सायकलवारीचे चौथे वर्ष असून, यामध्ये महिला, पुरुष आणि बालकांसह विविध वयोगटांतील भाविक उत्साहात सहभागी झाले आहेत. पर्यावरणाचे संगोपन हा या सायकलवारीचा मुख्य उद्देश असून, त्यामुळे इतर वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करत असल्याचे भाविकांनी सांगितले.
advertisement

छत्रपती संभाजीनगर येथून 20 जून रोजी सकाळी 7 वाजता ही सायकलवारी निघाली आणि काही वेळातच ती बिडकीन येथे पोहोचली. बिडकीन गावातील ग्रामस्थ आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी सर्व भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर ही वारी पैठण, शेवगाव आणि कडा येथे मुक्कामासाठी थांबणार आहे. 307 किमीचा प्रवास करून सायकलस्वार पंढरपूर येथे पोहोचतील, असे छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

पंढरपूरमध्ये सायकलवारी पोहोचल्यानंतर सर्व भाविकांची भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 22 जून रोजी महाराष्ट्रातील सर्व सायकलस्वार पंढरपूरमध्ये एकत्र येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून 3000 सायकलस्वार पंढरपूर सायकलवारीत सहभागी होणार आहेत. गतवर्षी सायकल स्वारांची ही संख्या 2300 इतकी होती आणि छत्रपती संभाजीनगर येथून 60 सायकलस्वार सायकलवारीत सहभागी झालेले आहे तसेच तसेच गतवर्षी ही संख्या 50 एवढी होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

या निमित्ताने सायकल रिंगण आणि सायकल संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वर्षभरात ज्या सायकलस्वारांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, त्यांचा आणि सायकल संघटनांचा सत्कार या संमेलनात करण्यात येणार असल्याचे देखील कचेश्वर यांनी म्हटले आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: 307 किमी, 3000 सायकली अन् रिंगण, अशीही वारी, एकदा हा व्हिडीओ पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल