Vastu Tips: घरात मास्टर बेडरूम या दिशेला करूच नये; अनंत अडचणी मागे लागतील, पाहा योग्य दिशा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. विशेषतः मास्टर बेडरूमची दिशा कुटुंबाच्या स्थिरतेवर, आरोग्यावर आणि आनंद-समृद्धीवर महत्त्वपूर्ण परिणाम करते. त्यामुळेच ती योग्य दिशेला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मुंबई : वास्तुशास्त्र नियमांची काळजी घेऊन घर बांधल्यास किंवा खरेदी केल्यास त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक बाबींमध्ये फायदा मिळतो. वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींचा तपशीलवार उल्लेख आहे. कोणत्या दिशेला कोठे काय असावं, या गोष्टी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला असलेली मास्टर बेडरूम आनंद, आरोग्य आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम करू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. विशेषतः मास्टर बेडरूमची दिशा कुटुंबाच्या स्थिरतेवर, आरोग्यावर आणि आनंद-समृद्धीवर महत्त्वपूर्ण परिणाम करते. त्यामुळेच ती योग्य दिशेला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा पवित्र मानली जाते आणि आध्यात्मिक उर्जेशी संबंधित आहे.
ईशान्य दिशा देव्हाऱ्यासाठी, ध्यान किंवा अभ्यास कक्षासाठी सर्वात शुभ मानली जाते, परंतु ती मास्टर बेडरूमसाठी नाही. या दिशेला बेडरूम असणं घरात अडचणी वाढण्याचं कारण ठरू शकतं. वास्तु तज्ज्ञांचे मते, यामुळे घराच्या प्रमुखासाठी आरोग्य किंवा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मास्टर बेडरूम चुकीच्या दिशेला असेल तर त्यामुळे वारंवार अडथळे, मानसिक ताण आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
मास्टर बेडरूम ईशान्य दिशेने नको -
वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला "ईशान कोन" म्हणतात. ही दिशा पवित्रता, शांती आणि आध्यात्मिक उर्जेशी संबंधित मानली जाते. म्हणूनच, पूजास्थान, ध्यान कक्ष किंवा अभ्यास या गोष्टींसाठी ही जागा आदर्श आहे.
तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा बेडरूमचे नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल, तर नैऋत्य दिशा मास्टर बेडरूमसाठी सर्वात योग्य मानली जाते. वास्तुनुसार नैऋत्य दिशा मास्टर बेडरूमसाठी आदर्श दिशा मानली गेली आहे.
advertisement
ही दिशा घरात आनंद आणि समृद्धीसाठी अनुकूल आहे. ती कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणते. या दिशेला असलेली बेडरूम सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राखते.
काही बाबतीत - काही प्रकरणांमध्ये ईशान्येला असेली मास्टर बेडरूम देखील सकारात्मक परिणाम देऊ शकतो, विशेषतः जर घराच्या पूर्व किंवा उत्तर बाजूला भरपूर मोकळी जागा असेल. वास्तु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कर्त्या व्यक्तीची बेडरूम या दिशेला करणे टाळावे. त्याचा त्यांच्या प्रगतीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 12:50 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात मास्टर बेडरूम या दिशेला करूच नये; अनंत अडचणी मागे लागतील, पाहा योग्य दिशा


