TRENDING:

Varah Jayanti 2025: वाद-संघर्ष होतील दूर मिळेल सुख-समृद्धी, वराह देवतेची पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती

Last Updated:

Varah Jayanti 2025: 'वराह' हा भगवान विष्णुचा तिसरा अवतार मानला जातो. हा अवतार घेऊन विष्णुने हिरण्याक्षाचा वध करून अधर्माचा नाश केला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात विष्णूने एकूण 10 अवतार घेतल्याचं मानलं जातं. 'वराह' हा त्यापैकी तिसरा अवतार मानला जातो. दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला वराह जयंती साजरी केली जाते. यावर्षी ही जयंती 25 ऑगस्ट 2025 रोजी (सोमवार) आहे. श्रीविष्णूंनी वराह अवतार का घेतला होता? वराह जयंती कशी साजरी करावी? याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी लोकल 18शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
advertisement

विष्णुने वराह अवतार का घेतला?

पौराणिक कथेनुसार, हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवून ठेवलं होतं. धर्माचा नाश होत असल्यामुळे भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं. त्यांनी आपल्या दातांवर पृथ्वीला उचलून योग्य स्थानी स्थापित केलं आणि हिरण्याक्षाचा वध करून अधर्माचा नाश केला. यामुळे धर्माची पुन्हा स्थापना झाली.

Aajache Rashibhavishya: आर्थिक लाभ होणार, यशप्राप्ती मिळणार, ही चूक टाळा, आजचं राशिभविष्य

advertisement

वराह जयंतीची पूजा कशी करावी?

वराह जयंतीच्या दिवशी घरातील देवघरात भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा शाळीग्राम स्थापन करून त्यांची पूजा केली जाते. शंख, चक्र, गदा, पद्म यांनी सजवलेल्या विष्णूंची आराधना केली जाते. धूप, दीप, नैवेद्य, फुले अर्पण करून मंत्रजप केल्यास विशेष फल मिळते.

पूजा मुहूर्त

तृतीया तिथी प्रारंभ: 25 ऑगस्ट, दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी

advertisement

तृतीया तिथी समाप्त: 26 ऑगस्ट, दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी

शुभ पूजामुहूर्त: 25 ऑगस्ट, दुपारी 1 वाजून 40 मिनिटे ते 4 वाजून 15 मिनिटे या वेळेत वराह पूजन करणे सर्वात शुभ ठरेल.

वराह जयंतीच्या दिवशी या मंत्रांचा जप करावा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

ॐ नमो श्रीवराहाय धरण्युद्धारणाय स्वाहा, ॐ वराहाय नमः, ॐ नमो भगवते वराहरूपाय भूभुर्वः स्वः पतये भूपतित्वं देहि ददापय स्वाहा, हे मंत्र जपल्याने घर, जमीन-जुमला तसेच संपत्ती संबंधी अडथळे दूर होतात, असं शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. वराह जयंती ही केवळ एक धार्मिक तिथी नसून अधर्माचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना यांचं प्रतीक आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या या विशेष अवताराची आराधना करून भक्त आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करतात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Varah Jayanti 2025: वाद-संघर्ष होतील दूर मिळेल सुख-समृद्धी, वराह देवतेची पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल