पूजेव्यतिरिक्त, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू, सोने, भांडी आणि उपकरणे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. परंतु, या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणं आवश्यक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया.
धनत्रयोदशी २०२५ तिथी - आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी होईल.
advertisement
धनत्रयोदशीवर खरेदीचे शुभ मुहूर्त (सोने आणि चांदी खरेदीसाठी)
ज्योतिषांच्या मते, धनत्रयोदशीवर खरेदीसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत:
पहिला मुहूर्त: सकाळी ८ वाजून ५० मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील.
दुसरा मुहूर्त: सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहील.
तिसरा मुहूर्त: संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत राहील.
खरेदीचा चौघडिया मुहूर्त
शुभ काल: सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
लाभ उन्नती मुहूर्त: दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.
अमृत काल: दुपारी २ वाजून ५७ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
चर काल: दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत.
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
धनत्रयोदशीवर पूजनाचा शुभ मुहूर्त -
दृक् पंचांगनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत राहील. या शुभ मुहूर्तावर तुम्ही माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करा, त्यांच्या उपासनेमुळे तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होईल.
धनत्रयोदशीवर काय खरेदी करावे आणि काय नाही -
धनत्रयोदशीवर सोने-चांदी, भांडी, झाडू, माता लक्ष्मीची मूर्ती, दक्षिणावर्ती शंख, कुबेर यंत्र, गोमती चक्र, कवडी (कौड्या), धने, भांडी, माता लक्ष्मीची चरण चिन्हे खरेदी करणे शुभ आहे.
याव्यतिरिक्त, या दिवशी तेल, प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, काळ्या रंगाचे वस्त्र, बूट (चप्पल/जोडे) आणि काचेची भांडी खरेदी करणे टाळावे, असे मानले जाते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)