कवड्यांची माळ पूर्वीपासूनच प्रसिद्ध
तुळजापूरच्या भवानी मातेची कवड्यांची माळ पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. या माळेला ऐतिहासिक वारसा असल्याचं सुध्दा सांगण्यात येत आहे. आता याच माळेच्या कवडीला महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून भौगोलीक मानांकन देण्यात आलय. चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाकडे राज्यातील अठरा प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने या प्रस्तावाला मान्यता देऊन राज्यातील नऊ वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी देण्यात आलेल्या भौगोलिक मानांकनामध्ये तुळजापूरच्या माळेचा समावेश करण्यात आलाय.
advertisement
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
माळेला अनन्यसाधारण महत्त्व
कवड्यांच्या माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळजाभवानी मातेचे भक्त कवड्यांची माळ गळ्यात परिधान करतात. इतिहास काळापासूनच कवड्यांच्या माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळजापुरात कवड्यांची माळ तयार केली जाते. या कवड्या मुंबईवरून आणल्या जातात. कवड्यांची माळ तयार करण्यासाठी शेकडो कुटुंबांना रोजगार मिळतो.
Ekadashi Importance: अशी झाली एकादशी व्रताची सुरुवात, ती अवतरली अन् विष्णूवरचा वार झेलला
भक्तांसाठी आनंदाची बाब
कवड्यांच्या माळेला अनादी काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे गळ्यात कवड्यांची माळ घालत असत. तुळजापूरला येणारे भाविक कवड्यांची माळ गळ्यात घालतात. कवड्यांच्या माळेला केंद्र सरकारच्या स्वामीत्व विभागाने भौगोलिक मानांकन दिले आहे. ही बाब श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी आनंदाची आहे,असे तुळजाभवानी मंदिराचे पुजारी नागनाथ भांजी यांनी सांगितले.