Ekadashi Importance: अशी झाली एकादशी व्रताची सुरुवात, ती अवतरली अन् विष्णूवरचा वार झेलला
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ekadashi Importance: कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. सर्व एकादशींप्रमाणे उत्पत्ती एकादशी ही देखील भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. पण...
मुंबई, 08 डिसेंबर : सर्वसाधारणपणे एकादशी तिथी दर महिन्याला दोनदा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात येते. संपूर्ण वर्षात एकूण 24 एकादशी आणि अधिकमास असताना 26 एकादशी असतात. पण, अनेकांना कदाचित माहीत नसेल की, एकादशी व्रताची सुरुवात कशी झाली. आज असलेली उत्पत्ती एकादशी ही एकादशीचे व्रताची सुरुवात मानली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. सर्व एकादशींप्रमाणे उत्पत्ती एकादशी ही देखील भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. पण, उत्पत्ती एकादशीमध्ये भगवान विष्णूच्या शरीरातून जन्मलेल्या एकादशीलाही महत्त्व आहे. याच कारणामुळे या एकादशीला भगवान विष्णूसोबत देवीचीही पूजा केली जाते.
धार्मिक आख्यायिकांनुसार, देवी एकादशीने कार्तिक कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूच्या अंशातून जन्म घेऊन मुर या राक्षसापासून भगवान विष्णूचे प्राण वाचवले. तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी देवीचे नाव एकादशी ठेवले. आज उत्पत्ती एकादशी व्रत आहे. उत्पत्ती एकादशीच्या पूजेमध्ये या व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून उत्पन्न एकादशीच्या व्रताची कथा जाणून घेऊया.
advertisement
असुर मुर आणि भगवान विष्णू यांच्यात युद्ध -
या संदर्भात एक कथा आहे की, एकदा भगवान विष्णू आणि मुर नावाच्या असुरामध्ये युद्ध चालू होते. जेव्हा भगवान विष्णू युद्ध करताना थकले तेव्हा ते बद्रिकाश्रमात गेले आणि काही काळ विश्रांती घेण्यासाठी एका गुहेत विश्रांती घेऊ लागले. त्यातच त्यांना झोप लागली.
advertisement
एकादशीला भगवान विष्णूच्या शरीरातून देवी प्रकट झाली -
भगवान विष्णूंचा पाठलाग करत असुर मुर बद्रिकाश्रमात पोहोचला. देव झोपेत मग्न पाहून त्याला त्यांना तिथेच मारावेसे वाटले. परंतु, भगवान विष्णूंना मारण्यासाठी मुर पुढे गेल्यावर देवाच्या शरीरातून एक देवी प्रकट झाली आणि या देवीने मुरचा वध केला. हा दिवस कार्तिक कृष्ण एकादशीचा होता.
एकादशी करण्याची सुरुवात -
या देवीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू तिला म्हणाले, देवी, कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीच्या दिवशी तू माझ्या देहातून जन्म घेतलास, म्हणून तुझे नावही एकादशी राहील आणि माझ्याबरोबर तुझीही पूजा होईल.
advertisement
उत्पत्ती एकादशीचे महत्त्व -
शास्त्रानुसार उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने व्रत आणि उपासना करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला दुःखापासून मुक्ती मिळते. इतकेच नाही तर या व्रताच्या पुण्य परिणामामुळे माणसाला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2023 9:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ekadashi Importance: अशी झाली एकादशी व्रताची सुरुवात, ती अवतरली अन् विष्णूवरचा वार झेलला