Astro Tips: सूर्यास्तानंतर घरात न चुकता करावी ही 5 कामं; अमंगळ-अशुभ गोष्टी राहतात दूर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sunset Vastu Upay: प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की घरात सुख, शांती आणि संपत्तीची कधीही कमी भासू नये. पण, लक्ष्मीची कृपा असेल तरच हे साध्य होऊ शकतं. यासाठी लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि उपवास-व्रत वगैरे करतात. यासोबतच अनेक उपायही केले जातात. पण, सूर्यास्तानंतर काही कामं केल्यानं तुमच्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप मिळू शकतो. घरात संपत्तीची कमतरता राहत नाही आणि नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. मात्र, हे उपाय करताना मनात कोणताही द्वेष किंवा कपट असता कामा नये. जाणून घेऊया ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून संध्याकाळच्या वेळेत काय करावे आणि काय करू नये?
advertisement
advertisement
advertisement
झोपू नका : सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही घरात झोपू नये (लहान मूल/ आजारी वृद्ध झोपल्यास हरकत नाही). यासोबतच यावेळी शारिरीक संबंधही प्रस्थापित करू नये. याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे धन आणि आरोग्याचे नुकसान होते. शास्त्रात पूजेसाठी सूर्यास्ताची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
घर अंधारात ठेवू नका : संध्याकाळी घरात अंधार असणे खूप अशुभ मानले जाते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी घरात अंधार ठेवू नये. यासाठी घरातील सर्व दिवे चालू करणे चांगले. असे केल्याने जीवनात प्रगतीची दारं खुली होतील. तसेच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)