या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो. कुबेर आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे घरात आनंदात आणि उत्साहात स्वागत आगमन होणेही गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी आवर्जून केल्यास फायदा होऊ शकतो. माता लक्ष्मी आणि कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरात धनवर्षा होण्यासाठी धनतेरसच्या दिवशी तुम्हाला 5 वस्तू दारात ठेवायच्या आहेत. त्या 5 गोष्टी कोणत्या याबाबत पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का असतो तिचा धोका? कसं काढायचं घराबाहेर?
दारात ठेवा या 5 वस्तू
1) धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या दारामध्ये लक्ष्मीची पावलं ठेवायची आहेत. जेणेकरून लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल.
2) दुसरं म्हणजे दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे.
3) आणि तिसरं म्हणजे दरवाजासमोर तुळस ठेवायची आहे.
4) आणि चौथी गोष्ट म्हणजे दारासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे.
5) आणि पाचवं महत्त्वाचं म्हणजे घराच्या मुख्यादरवाजांवर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे.
रत्न खरेदी करताय? अशी करा खरी पारख, पाहा Video
या पाच गोष्टी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहील आणि घरात घनधन्याची कमी राहणार नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर असेल, असे पाचखेडे महाराज सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





