वाजता सुरू होईल, व 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 वाजता संपेल.’
‘प्रत्येक वर्षात असा एक शुभ मुहूर्त असतो ज्यामध्ये देवी लक्ष्मी सिंहावर स्वार होते. हा शुभ मुहूर्त दिवाळीच्या दिवशी असतो. हिंदू मान्यतेनुसार सिंह राशीत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. यंदाच्या वर्षी सिंह लग्न 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:14 वाजता सुरू होईल व 2:27 पर्यंत संपेल. या काळात देवी लक्ष्मीची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होईल,’असेही ज्योतिषी शर्मा म्हणाले.
advertisement
दिवाळीत या दिवशी 'यमदीपदान' करायला विसरू नका; अकाली मृत्यूचं भय टाळण्यासाठी..!
पूजा कशी कराल?
दिवाळीत भगवान श्री गणेश, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. पुराणात असं म्हटलं आहे की, ‘दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी प्रत्येक घरात येते, त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी व तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी घराची स्वच्छता करणं आवश्यक आहे. घरामध्ये प्रकाश राहील, अशी व्यवस्था करावी. घर पूर्णपणे स्वच्छ करून घरात गंगाजल शिंपडावं.’
अशा प्रकारे सजवा पूजा कलश
तुम्ही मातीचे दिवे, मेणबत्या आणि रांगोळी काढूनही घर सजवू शकता. देवघरात किंवा लिव्हिंग रुममध्ये टेबलावर किंवा स्टूलवर लाल सुती कापड अंथरा. त्यावर धान्य पसरवून धान्याच्या मध्यभागी 75 टक्के पाण्यानं भरलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवा. कलशात सुपारी, झेंडूचं फूल, एक नाणं आणि थोडे तांदूळ टाका. त्यानंतर कलशावर आंब्याची पाच पानं वर्तुळात स्वरूपात ठेवा. कलशाच्या उजव्या बाजूला दक्षिण-पश्चिम दिशेला श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो आणि मध्यभागी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा.
लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी 8 शुक्रवार करा 'हे' व्रत, आर्थिक संकटं होतील दूर
हे लक्षात ठेवा
देवी लक्ष्मीची मूर्ती घेऊन तिला जलस्नानाच्या रूपात पंचामृत अर्पण करा. त्यानंतर मूर्ती पुन्हा पाण्यानं धुवून स्वच्छ टॉवेलनं पुसून कलशाजवळ परत ठेवा. देवीला हळदकुंकू, पुष्पहार अर्पण करा. देवीसमोर उदबत्ती लावा. देवीला नारळ, पानसुपारी अर्पण करा. फळांचा नैवेद्य दाखवा. देवीसमोर पुष्पगुच्छ, पैसे ठेवा. तुमचं अकाउंट बुक, धन आणि व्यवसायाशी संबंधित इतर वस्तू देवीसमोर ठेवा. देवी लक्ष्मीला गंध लावा, देवीसमोर दिवा लावा. पूजेनंतर संकल्प करून देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान श्री गणेश यांची प्रार्थना करा. त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र आणि गणपती स्तोत्राचा पाठ अवश्य करा.