लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी 8 शुक्रवार करा 'हे' व्रत, आर्थिक संकटं होतील दूर

Last Updated:

व्यक्तीला संपत्ती आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होते. हे व्रत कुटुंबात देवी लक्ष्मीचा निवास राखण्यासाठी विशेष शुभ मानले जाते.

News18
News18
मुंबई : घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन भरभराट व्हावी, आर्थिक संपन्नता यावी यासाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. लक्ष्मीमातेची एकदा कृपा झाली की सर्व आर्थिक संकटं दूर होतात. लक्ष्मीचामातेचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वैभवलक्ष्मीची पूजा करणं आहे. हे देवी लक्ष्मीच्या आठ रूपांपैकी एक रूप आहे. वैभवलक्ष्मीचं व्रत केल्यास जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असं ज्योतिषी सांगतात. व्यक्तीला संपत्ती आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होते. हे व्रत कुटुंबात देवी लक्ष्मीचा निवास राखण्यासाठी विशेष शुभ मानले जाते.
वैभवलक्ष्मीमातेला समर्पित व्रत शुक्रवारी केलं जातं. स्त्री आणि पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात. या व्रतामुळे व्यवसायात वृद्धी होते आणि संपत्तीत वाढ होते. व्रतावेळी श्री यंत्राची पूजा करणं विशेष लाभदायक असतं. वैभवलक्ष्मीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा विशेष वापर केला जातो.
व्रताचे नियम
धनप्राप्तीसाठी 8 शुक्रवार देवी लक्ष्मीचं व्रत करा. लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा करा किंवा धनलक्ष्मीच्या रूपाची पूजा करा. दिवसभर फक्त पाणी प्या किंवा फळं खा. संध्याकाळच्या वेळीही अन्नाचे सेवन करू नये. मध्यरात्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. “ओम श्री श्रीय नमः” या मंत्राचा 11 माळा जप करा. लक्ष्मीमातेला गुलाबाची फुलं किंवा गुलाबाचं अत्तर अर्पण करा.
advertisement
पूजेची पद्धत
शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. व्रताचा संकल्प घेतल्यानंतर स्वच्छ ताटात मूठभर तांदूळ आणि पाण्याने भरलेले तांब्याचं भांडं ठेवा. हे देवीच्या मूर्तीजवळ ठेवा. देवीला धूप, दिवा, सुगंध आणि पांढरी फुले अर्पण करा. उपवासाच्या दिवशी देवीला खीर अर्पण करावी. त्यानंतर शुक्रवार व्रताची कथा ऐका.
advertisement
लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाची पद्धत
व्रताचं उद्यापन करण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रतकथा व दक्षिणा तसंच ग्रंथ दान करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास संपतो. प्रदोषकाळात देवी लक्ष्मीचे व्रत स्थिर ठेवून नंतर समाप्त करायला हवं.
श्रीयंत्राचा वापर
या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या ठिकाणी उर्ध्वमुख श्रीयंत्राचे चित्र लावा. श्रीयंत्राचे चित्र रंगीत असल्यास उत्तम राहील. श्रीयंत्र अगदी डोळ्यासमोर असेल अशा प्रकारे ठेवा. जिथे जिथे श्रीयंत्र बसवाल तिथे घाण करू नका, त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
मराठी बातम्या/अध्यात्म/
लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी 8 शुक्रवार करा 'हे' व्रत, आर्थिक संकटं होतील दूर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement