Diwali 2023: दिवाळीत या दिवशी 'यमदीपदान' करायला विसरू नका; अकाली मृत्यूचं भय टाळण्यासाठी..!

Last Updated:

Yamdeepdan 2023: संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस आहे, ज्यात मृत्यूची देवता असलेल्या यमराजाची पूजा केली जाते. ही पूजा फार मोठी नसून केवळ दिवा दान करून केली जाते.

News18
News18
मुंबई, 02 नोव्हेंबर : यंदा 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी यमदीपदान अवश्य करावे. असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस आहे, ज्यात मृत्यूची देवता असलेल्या यमराजाची पूजा केली जाते. ही पूजा फार मोठी नसून केवळ दिवा दान करून केली जाते. काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे दान करतात.
ज्योतिष तज्ज्ञ सांगतात यमदीपदान करणे महत्त्वाचे आहे. स्कंदपुराणात लिहिले आहे: कार्तिकस्यते पक्षे त्रयोदश्यं निशामुखे । यमदीपं बहिर्दाद्यापमृत्युर्विनिष्यति । म्हणजेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टाळतो. पद्मपुराणात लिहिले आहे: कार्तिकस्ये पक्षे त्रयोदश्यं तू पावके। यमदीपं बहिरदाद्यपमृत्युर्विनाश्यति । कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला यमराजासाठी घराबाहेर दिवा लावावा, यामुळे दुर्मृत्यूचा नाश होतो.
advertisement
यमदीपदानाची सोपी पद्धत:
प्रदोषकाळात यमदीप दान करावे. यासाठी पिठाचा मोठा दिवा घ्या. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी (या लहरी मृत्यूचे कारण आहेत) शांत करण्याची क्षमता असते. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारे ठेवा की वातीची चार टोके दिव्याच्या बाहेर दिसतील. आता त्यात तिळाचे तेल भरून त्यात थोडे काळे तीळ टाका. प्रदोषकाळात अशा प्रकारे तयार केलेल्या दिव्याची रोळी, अक्षत आणि फुलांनी पूजा करावी. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर थोडी साखर किंवा गव्हाचा ढीग करून त्यावर दिवा लावावा. दिवा लावण्यापूर्वी तो पेटवून दक्षिण दिशेकडे पहा (दक्षिण दिशा ही यम लहरींसाठी पोषक असते म्हणजेच यम लहरी दक्षिण दिशेकडून जास्त प्रमाणात आकर्षित होतात आणि प्रक्षेपित होतात) आणि तयार केलेल्या ढिगाऱ्यावर चारमुखी दिवा ठेवा. ‘ओम यमदेवाय नमः’ म्हणत दक्षिण दिशेला नमस्कार करावा.
advertisement
यम दीपदान मंत्र:
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह |
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||
इसका अर्थ है, धनत्रयोदशीपर यह दीप मैं सूर्यपुत्रको अर्थात् यमदेवताको अर्पित करता हूं। मृत्युके पाशसे वे मुझे मुक्त करें और मेरा कल्याण करें।
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Diwali 2023: दिवाळीत या दिवशी 'यमदीपदान' करायला विसरू नका; अकाली मृत्यूचं भय टाळण्यासाठी..!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement