Tulsi Upay: तुळशीला या 5 गोष्टी अर्पण करणं शुभ फळदायी, लक्ष्मीच्या कृपेनं वाढत जाईल संपत्तीचा ओघ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Upay Marathi: तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, करिअरमधील अडथळे दूर होतात, घरात नेहमी शांती राहते आणि संकटांचा नाश होतो. मात्र, तुळशीशी संबंधित उपाय पद्धतशीर केले तरच या समस्या टाळता येतील. हे उपाय गुरुवार आणि शुक्रवारी सर्वात प्रभावी आहेत, परंतु आपण इतर काही शुभ दिवशीदेखील करू शकता. ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही उपाय ज्यामुळे घरावर देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो-
advertisement
श्रृंगार साहित्य अर्पण करा: हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशीला तुळशीच्या श्रृंगार साहित्य अर्पण केले पाहिजे. यामध्ये बांगड्या, बिंदी, लाल चुनरी, हळद-कुंकू इत्यादींचा समावेश असावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. याने व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतात.
advertisement
advertisement
advertisement
कच्चे दूध अर्पण करणे : तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. वास्तविक, कच्चे दूध फक्त गुरुवार आणि शुक्रवारीच अर्पण करावे. मात्र एकादशीच्या दिवशीही तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास फलदायी ठरते. असे केल्याने व्यक्तीच्या अशुभ गोष्टी दूर होऊन जीवनात आनंद येतो, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)