इंदिरा एकादशी व्रताची कथा -
सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले.
तेव्हा नारदजी म्हणाले की, मी एके दिवशी यमलोकात गेलो होतो. तेथे यमराजांना भेटलो, त्यांचे कौतुक केले. त्यादरम्यान मी तुझ्या वडिलांना पाहिले. ते यमलोकात होते. नारदजींनी आपल्या वडिलांचा संदेश राजा इंद्रसेनला सांगितला. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, काही कारणास्तव त्यांच्या एकादशी व्रतामध्ये काही अडथळे येत होते, त्यामुळे त्यांना यमलोकात यमराजांसोबत वेळ घालवावा लागतोय. तुमच्याकडून शक्य असेल तर वडिलांसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करा. याने ते यमलोकातून मुक्त होऊन स्वर्गात स्थान मिळवू शकतील.
advertisement
भद्र राजयोग जुळून आल्यानं पालटणार नशीब! या 3 राशींना बक्कळ कमाईचे योग
तेव्हा राजा इद्रसेनने नारदांना इंदिरा एकादशी व्रताची पद्धत सांगण्यास सांगितले. नारदजी म्हणाले की, इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान शालिग्रामसमोर पितरांचे श्राद्ध करा. ब्राह्मणांना फळे आणि अन्न अर्पण करा नंतर त्यांना दक्षिणा द्या. त्यानंतर उरलेले अन्न गायीला खाऊ घाला.
त्यानंतर धूप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी. नंतर रात्री भागवत जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वतः भोजन करून व्रत पूर्ण करा. नारदजी म्हणाले की हे राजन! जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले तर तुमच्या वडिलांना नक्कीच स्वर्गात स्थान मिळेल. यानंतर नारदजी तेथून निघून गेले.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आल्यावर राजा इंद्रसेनने इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे त्यांचे वडील यमलोकातून मुक्त होऊन विष्णुलोकात गेले. मृत्यूनंतर राजा इंद्रसेनलाही स्वर्ग मिळाला.
पितृपक्षात कावळा अशा पद्धतीनं देतो शुभ-अशुभ संकेत, पूर्वज अतृप्त असतील तर..?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)