TRENDING:

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची रोजची पूजा कशी करावी? शास्त्र, मंत्र आणि विधी संपूर्ण माहिती

Last Updated:

Ganesh Chaturthi: गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि शास्त्र यांचा संगम आहे. घराघरात बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दररोज पूजेचे योग्य नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाची पूजा श्रद्धेने आणि शास्त्रानुसार करणं महत्त्वाचं मानलं जातं. गणेशोत्सव हा फक्त आनंद आणि उत्साहाचा सण नसून श्रद्धा, भक्ती आणि शास्त्र यांचा संगम आहे. घराघरात बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दररोज पूजेचे योग्य नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते. पूजेसाठी आवश्यक मंत्र, विधी आणि नैवेद्य कोणता द्यावा या विषयी जाणून घेऊ.
advertisement

गणेश पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. पूजेची सुरुवात आचमन करून होते. यात तीन वेळा पाणी घेऊन ‘ॐ केशवाय नमः’, ‘ॐ माधवाय नमः, ॐ गोविंदाय नमः असे उच्चार करावेत. आचमनानंतर जमिनीची पूजा करून संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे आपल्या मनातील इच्छा आणि हेतू सांगून पूजा करण्याचा निर्धार व्यक्त करणे.

advertisement

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हीही करताय का चुका? या नियमांचं करा पालन

गणपती पूजेतील सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे  ‘ॐ गण गणपतये नमः’. हा मंत्र पूजेदरम्यान सातत्याने उच्चारला जातो. याशिवाय गणपती अथर्वशीर्ष हे पठण अत्यंत फलदायी मानले जाते. संध्याकाळी आरतीच्या वेळी ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आणि ‘जय देव जय देव’ या आरत्या गायल्या जातात.

advertisement

पूजा कशी करावी?

पूजेदरम्यान प्रथम गणरायाला गंध, अक्षता, फुले अर्पण केली जातात. विशेषतः दुर्वा या पूजेत अनिवार्य आहेत. त्यानंतर फळे, मिठाई आणि गणरायाचा लाडका मोदक नैवेद्य दाखवला जातो. काही भक्त दूध, नारळ आणि पंचामृत अर्पण करतात. पूजेनंतर दीपमाळेला समई लावून गणेशाची आरती केली जाते.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत रोज गणपती समोर बसून शांतचित्ताने पूजा करणे महत्त्वाचे आहे. पूजेनंतर हातात अक्षता घेऊन गणरायाला प्रार्थना केली जाते. संकेत जंगम गुरुजी यांच्या मते, “प्रारंभी विनंती करो गणपती, विद्या करो गुरु सागरा” अशी प्रार्थना केल्याने ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होते. पूजा फक्त विधीपुरती न करता भावपूर्वक केल्यास गणराय प्रसन्न होतो.

advertisement

पूजेच्या शेवटी मोदक आणि इतर नैवेद्य गणपतीला दाखवून आरती केली जाते. यानंतर प्रसाद सर्व भक्तांना वाटला जातो. गणेशोत्सवात प्रत्येक विधीचा आपला खास अर्थ आणि महत्त्व आहे. भक्ती, श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली पूजा हेच या सणाचे खरे सौंदर्य आहे. योग्य मंत्र, नियमानुसार केलेली पूजा आणि भावनेची शक्ती यामुळेच गणपती भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमयता आणतो, असा विश्वास आहे, अशी माहिती संकेत जंगम गुरुजी यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची रोजची पूजा कशी करावी? शास्त्र, मंत्र आणि विधी संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल