TRENDING:

गणेश चतुर्थीला या राशींना राजयोग; तब्बल तीनशे वर्षांनी होणार लाभ Video

Last Updated:

गणेश चतुर्थीचा दिवस हा तीन राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. या तीन राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर , 18 सप्टेंबर : गणरायाच्या आगमनासाठी अवघा काही अवधी शिल्लक राहिला असून साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षीची गणेश चतुर्थीही अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्याची राहणार असून या गणेश चतुर्थीला तब्बल 300 वर्षानंतर एक अद्भुत योग घडत आहे. तो म्हणजे या गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे दोन शुभ योग तयार होत आहेत. म्हणून या अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीचा दिवस हा तीन राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. या तीन राशी कोणत्या आहेत आणि या योगाने कसा फायदा होणार आहे यासंदर्भातच नागपुरातील ज्योतिषशास्त्र अभ्यासक डॉ.ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिली आहे.
advertisement

असा असेल शुभ मुहूर्त

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने समजामनात नवं चैतन्य आणि उत्साह बघायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिक आणि धार्मिक उत्सवातील अतीशय महत्वपूर्ण असलेला सण म्हणजे गणेशत्सव हा आहे. सर्वत्र गणपतीचे 10 दिवस मोठ्या उत्साहाचे आणि भक्तिभावाने आसतात. मात्र यंदाची गणेश चतुर्थीला ज्योतिषशास्त्र नुसार देखील मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

advertisement

तब्बल तीनशे वर्षांनी हा एक दुर्मिळ योग घडत आहे. पौराणिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला आपण गणेशोत्सव प्रारंभ करत असतो. यंदा भाद्रपद महिन्याच्या शुक्लाची चतुर्थी ही 18 सप्टेंबर पासून ते 19 सप्टेंबर पर्यंत आहे. मात्र आपण उदय तिथीनुसार आणि आपल्या पंचांगानुसार 19 तारखेला गणेश चतुर्थी साजरी करत आहोत या चतुर्थीचा मुहूर्त 11 ते 1.45 दरम्यान आसुन हा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे.

advertisement

लालबागच्या राजाचं आहे कोल्हापूरकरांशी नातं, तुम्हाला माहितीय का 4 दशकांची परंपरा?

तब्बल तीनशे वर्षांनी असा राजयोग

ज्योतिष शास्त्रानुसार यंदाची गणेश चतुर्थी अतिशय दिव्य आणि प्रभावी असणार आहे. चतुर्थीला दोन महत्त्वाचे राजयोग घडणार असून या अतिशय दुर्मिळ योग मानला जातात त्यातील एक म्हणजे ब्रह्मयोग आणि दुसरा शुक्ल योग असे आहेत. ब्रह्म योगमध्ये अतिशय चांगले गृह समजले जाणाऱ्या गुरु आणि शुक्ल हे अतिशय शुभ ग्रह मानले जात असून व्यक्तिगत जीवनात त्यांचा फार चांगला परिणाम होत असतो हे दोन ग्रह एकमेकांच्या केंद्रामध्ये असल्याने त्याचा फार प्रभावी आणि शुभ परिणाम दिसून येईल.

advertisement

हा राजयोग तीनशे वर्षानंतर होत असून याला ब्रह्मयोग असे देखील म्हणतात. त्याचप्रमाणे चंद्र हा तुला राशीमध्ये त्याच्या उंचीच्या पाणी असल्यामुळे हा एक अल्फा योग असतो यालाच आपण चंद्र किंवा शुक्लोक असे देखील म्हणतो. या दोन महत्त्वाचे योग मनात असल्याने यंदाची गणेश चतुर्थी फार महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी मानला जात आहे,अशी माहिती डॉ.ज्योतिर्वेद भूषण यांनी दिली.

advertisement

गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शूभ मुहूर्त कोणता? पाहा काय आहे योग्य पद्धत

तीन राशींवर होणार अतिशय चांगला परिणाम

या दुर्मिळ योगामुळे यंदाची गणेश चतुर्थी ही तीन राशींसाठी अतिशय प्रभावी असणार आहे. त्यातील एक म्हणजे मकर रास, मिथुन रास आणि मेष रास अशा या तीन राशी आहेत. मकर राशीसाठी उतरती साडेसाती असल्याने त्याचा फार चांगला प्रभाव दिसून येणार आहे यामध्ये धनसंपत्ती मानसन्मान व्यवसाय वैवाहिक जीवन आणि लग्न जुळण्याची मोठी उपलब्धी राहणार आहे.

उतरत्या साडेसातीमुळे हा ब्रह्मयोग अतिशय शुभ असणार आहे. धर्मेश राशीसाठी गुरुची स्थिती अतिशय चांगली मानला जात असून चंद्र हा तिच्या उंचीच्या स्थानी असल्याने मेष राशी वाल्यांसाठी धनसंपदा नोकरी उद्योग इतर सर्वच बाबतीत ही गणेश चतुर्थी लाभदायी असणार आहे. त्याचप्रमाणे मिथुन राशीसाठी देखील ही गणेश चतुर्थी फार चांगला परिणाम देऊन जाणार आहे अशी माहिती देखील भूषण यांनी दिली.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
गणेश चतुर्थीला या राशींना राजयोग; तब्बल तीनशे वर्षांनी होणार लाभ Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल