advertisement

फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार सर्वाधिक कसोटीचा काळ! मोठे आव्हाने येणार, प्रचंड नुकसान होणार

Last Updated:

Astrology News : फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. मात्र हा महिना काही राशींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा ज्योतिषांनी दिला आहे.

Astrology News
Astrology News
मुंबई : फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. मात्र हा महिना काही राशींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा ज्योतिषांनी दिला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारीमध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे काही अशुभ योग निर्माण होत आहेत. विशेषतः राहू, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे ग्रहण योग आणि अंगारक योग तयार होणार असून, त्याचा परिणाम काही राशींवर नकारात्मक स्वरूपात दिसू शकतो.
मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, आणि याच राशीत राहू आधीपासून विराजमान आहे. मंगळ व राहू यांच्या युतीमुळे अंगारक योग तयार होतो, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. याशिवाय, 13 फेब्रुवारी रोजी सूर्य आणि राहू यांच्या संयोगामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. या दोन्ही योगांचा एकत्रित परिणाम फेब्रुवारी महिन्यात अस्थिरता, मानसिक तणाव, अपघाताची शक्यता आणि करिअरमध्ये अडचणी निर्माण करू शकतो.
advertisement
ज्योतिषांच्या मते, या काळात पाच राशींना विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. या राशींच्या लोकांना करिअर, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सावध राहणे आवश्यक ठरेल. कोणत्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पावले उचलावीत, असेही सांगण्यात येत आहे.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खर्चिक ठरू शकतो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता असून, आर्थिक नियोजन बिघडू शकते. याशिवाय समाजात तुमची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता आहे. चुकीच्या शब्दांमुळे किंवा गैरसमजांमुळे सामाजिक नुकसान होऊ शकते. मित्रांशी व सहकाऱ्यांशी संबंध ताणले जाण्याचीही शक्यता असल्याने बोलताना आणि वागताना संयम बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
सिंह रास
सिंह राशीत सध्या केतूचे भ्रमण सुरू असल्यामुळे आधीच अस्थिरता जाणवू शकते. त्यातच ग्रहण योग आणि अंगारक योगाचा परिणाम झाल्याने करिअरमध्ये मोठे चढ-उतार अनुभवायला लागू शकतात. नोकरीत बदल, वरिष्ठांशी मतभेद किंवा कामाचा ताण वाढू शकतो. वैवाहिक जीवनात देखील गैरसमज आणि वाद उद्भवू शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. अंगारक योगामुळे अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्ता, जमीन किंवा वारसाहक्काशी संबंधित वाद असतील, तर ते सध्या पुढे ढकलणे हितावह ठरेल. कामाच्या ठिकाणी देखील कुठलीही चूक टाळण्यासाठी अतिरिक्त दक्षता घेणे आवश्यक आहे.
advertisement
कुंभ रास
कुंभ राशीवर या योगांचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मानसिक गोंधळ, निर्णयक्षमतेत कमतरता आणि संभ्रमाचा सामना करावा लागू शकतो. करिअरबाबत घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्या किंवा किरकोळ आरोग्य त्रास संभवतो.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील ठरू शकतो. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास ते वाढण्याची शक्यता आहे. मालमत्तेचे नुकसान किंवा वाहनाशी संबंधित अडचणी येऊ शकतात. कायदेशीर प्रकरणांमध्ये निकाल प्रतिकूल जाण्याची शक्यता असल्याने कोणतेही जोखमीचे पाऊल उचलताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) 
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार सर्वाधिक कसोटीचा काळ! मोठे आव्हाने येणार, प्रचंड नुकसान होणार
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement