शुभ मुहूर्त - गणेश जयंतीच्या दिवशी मध्याह्न गणेश पूजा मुहुर्त सकाळी 11.31 ते दुपारी 1:40 पर्यंत असेल. गणेश भक्तांना बाप्पाची उपासना पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 2 मिनिटांचा मिळतील. या व्यतिरिक्त वर्जित चंद्र दर्शनची वेळ रात्री 09.02 ते 09.07 या वेळेत आहे.
पूजा पद्धत - गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नंतर एका पाटावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. गणरायाला गंगाजलाने स्नान करा आणि नंतर त्यांना धूप, दिवे, फुले, रोली, दुर्वा, सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
advertisement
नव्या वाटा शोधाव्या लागणार! फेब्रुवारी महिना या राशींना अनलकी, धनहानीचे संकेत
पूजेनंतर गणपतीला प्रिय मोदक अर्पण करा आणि नंतर गणेश जयंतीची कथा वाचा किंवा ऐका. आपण गणेश मंत्रांचा देखील जप करू शकतो. पूजेच्या शेवटी गणेशाची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वितरित करा.
गणेश जयंतीचे महत्त्व - गणेशाची उपासना विघ्नहर्ता प्रतीक म्हणून केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. नवीन कामांच्या सुरुवातीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी उपवास करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे.
या जन्मतारखा असलेल्या मुली फार इमोशनल होतात; जोडीदाराशी जुळवून घेण्यात नंबर 1
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)