जया किशोरी यांचे अनेक मोटिवेशनल सेमिनार आणि वेबिनार आयोजित केले जातात. ज्यांद्वारे त्या विविध विषयांवर प्रेरणादायी विचार व्यक्त करतात. अशाच एका सार्वजनिक व्यासपिठावर बोलताना त्यांनी सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशा 3 वेळा येतात जेव्हा तिनं शांत राहणं हा सर्वोत्तम उपाय असतो. कितीही भावना अनावर झाल्या तरी अशा स्थितीत व्यक्तीनं शांतच राहायला हवं. या 3 स्थिती नेमक्या आहेत तरी कोणत्या, जाणून घेऊया.
advertisement
- राग आल्यावर राखावं मौन!
जया किशोरी सांगतात की, जेव्हा जेव्हा खूप राग येतो, तेव्हा तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कारण रागाच्या भरात तोंडातून निघालेले शब्द एखाद्या व्यक्तीच्या जिव्हारी लागू शकतात आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो.
- अर्धवट ज्ञानामुळे होऊ शकतं हसं!
असं म्हणतात की, अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा ज्ञान नसलेलं बरं. अपूर्ण माहिती खूप नुकसानदायी असते. त्यामुळे अडचणी वाढू शकतात. जया किशोरी सांगतात की, अपूर्ण माहिती असल्यानं आपण स्वत: आपल्या बोलण्यानं स्वत:चं हसं करून घेतो. यामुळे जगासमोर आपण मुर्ख ठरू शकतो. म्हणून जर एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसेल, त्याबाबत पूर्ण ज्ञान नसेल तर शांत राहणं कधीही चांगलं.
- शांत बसलात म्हणजे तुम्ही चुकीचे ठरत नाही!
जर आपल्या बोलण्यानं आपल्या जवळची व्यक्ती दुखावली जाणार असेल, तिच्या मनाला वेदना होणार असतील तर अशा स्थितीत आपण शांत राहणं कधीही योग्य. जया किशोरी सांगतात की, अशा परिस्थितीत आपण माफी मागणं किंवा गप्प बसणं म्हणजे आपण चुकलात असा अर्थ होत नाही. तर, याचा अर्थ असा होतो की, आपल्या रागापेक्षा, कोण चूक कोण बरोबर यापेक्षा जास्त मौल्यवान आपलं त्या व्यक्तीसोबतचं नातं आहे.