अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला आणि स्थानबदलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट राशीत प्रवेश करतो. गुरू ग्रह सध्या आपल्याच राशीत म्हणजे मेषमध्ये विराजमान आहे. येत्या 1 मे रोजी दुपारी 1:50 वाजता गुरूचा वृषभप्रवेश होईल. या राशीप्रवेशाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल.
अयोध्येचे ज्योतिषी नीरज भारद्वाज सांगतात, ग्रह वेळोवेळी राशीपरिवर्तन करत असतात. या क्रियेला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता येत्या 1 मे रोजी गुरू ग्रह वृषभ राशीत जाईल, तर दुसरीकडे कन्या राशीत केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे दोघांमध्ये सिंह राशीचा नवम भाव निर्माण होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. त्यापैकी 3 राशी अशा आहेत ज्यांची गुरूच्या कृपेने भरभराट होईल.
advertisement
(पहिलं चंद्रग्रहण! दिसणार नाही, पण जाणवेल, 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी जरा जपून)
सिंह राशीला काय मिळणार?
या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता आपल्याला मिळतील. कुटुंबात वाद होऊ शकतात. परंतु अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आई-वडिलांचं चांगलं सहकार्य मिळेल. नवी मालमत्ता खरेदी करू शकाल.
(राहू-सूर्याची युती, 25 वर्षांनी खतरनाक योग! 3 राशींच्या व्यक्तींनी जरा साभांळून)
कन्या राशीवर काय परिणाम होईल?
या राशीच्या व्यक्तींना आर्थिक, मानसिक अडचणींपासून सुटका मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेली आर्थिक चणचण दूर होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. नवदाम्पत्याला गूड न्यूज मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
मिथुन राशीच्या व्यक्तींना काय फायदा?
आपल्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. अपरंपार यश मिळेल. व्यवसाय विस्तारेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. उधार म्हणून दिलेले पैसे आता आपल्याला मिळतील. शिवाय वडिलोपार्जित संपत्तीतूनही पैसे मिळू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
