TRENDING:

हिंदू विवाहानंतर का करतात परळ विधी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Last Updated:

परळ हा विधी लग्नानंतर सत्यनारायण कथेच्या दिवशी सत्यनारायण झाल्यानंतर लगेच केला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 16 डिसेंबर: हिंदू धर्मात विवाह हा एक संस्कार मानला जातो. विवाहात अनेक विधी केले जातात. यातीलच एक म्हणजे लग्नानंतर केला जाणारा परळ विधी होय. हे विधी अजूनही केले जातात. अनेकांना याबाबत माहिती नसते. तरीही परंपरा म्हणूनच हे विधी केले जातात. मात्र, लग्नानंतर हा विधी का केला जातो? कधी केला जातो? आणि काय महत्त्व आहे? हेच आपण वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement

परळ म्हणजे काय?

लग्नानंतर वर वधूच्या घरच्यांनी परळ ही विधी करून घ्यावी. परळ म्हणजे अन्नपूर्णा देवीची शांती होय. शब्दशः परळ म्हणजे पात्र होय. हा एक कुळाचार असतो. जो सर्व समाजातील कुटुंबाने करायला पाहिजे. जास्तीत जास्त 21 पात्र वाढायचे असतात. पात्र वाढल्यानंतर सर्वांच्या मधात शिवपिंड स्थापन करतात किंवा कोणाच्या घरीपाटा वरवंटा ही ठेवतात. त्याचं अन्नपूर्णा सोबत लग्न लावतात. अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न राहावी हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्याकडे लग्नात अनेक लोकं येतात. तेव्हा लोकांना जेवण दिले जाते. त्यात अनेकजण उष्टं टाकतात. अशाने अन्नपूर्णा नाराज होते. त्यामुळे हा विधी केला जातो, असं पाचखेडे महाराज सांगतात.

advertisement

लग्नात मंगलाष्टके किती असावीत? का गायली जातात? पाहा खरं कारण Video

View More

हा विधी कधी करतात?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

हा विधी लग्नानंतर सत्यनारायण कथेच्या दिवशी सत्यनारायण झाल्यानंतर लगेच केला जातो. सत्यनारायण आणि अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. आता पात्रावर कोणी बसावे? तर, पहिला मान गुरुजींचा असतो. त्यानंतर घरातील म्हणजेच कुळातील सर्व मुलांनी किंवा सर्व पूरुषांनी बसायचं असतं. पात्रात कच्चा पापड आणि पुरणाचा दिवा लावावा. त्यानंतर मग 5 मंगलाष्टके आणि अन्नपूर्णादेवीची आरती आणि शंकराची आरती केली जाते. अशाप्रकारे ही विधी पार पडते, अशी माहिती पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
हिंदू विवाहानंतर का करतात परळ विधी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल