तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गणरायाची मूर्ती कोणत्या दिशेला बसवायची? हा केवळ परंपरेचा भाग नाही. त्यामागे शास्त्रीय आणि ऊर्जाशास्त्राशी संबंधित कारणं आहेत. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे या दोन दिशा अत्यंत सकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या आहेत. विशेषतः पूर्व दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे गणपतीची स्थापना शक्य असल्यास नेहमी पूर्व दिशेलाच करावी.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला दुर्वाच का वाहतात? हे आहे खरं कारण
ज्यांच्या घरात जागेचा अभाव आहे, त्यांनी दक्षिण भिंतीलगत गणपतीची मूर्ती ठेवून बाप्पाचं तोंड उत्तरेकडे करावं. मात्र, ही दिशा केवळ पर्यायी आहे. जागा कमी असेल तरच हा पर्याय निवडावा. अन्यथा मूर्तीसाठी नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेचीच निवड करावी.
गणपती बसवताना मूर्तीच्या मागे थोडी मोकळी जागा ठेवावी. ती एकदम भिंतीला चिकटवू नये आणि शक्यतो मूर्ती पूर्वेकडे तोंड करून असावी. पूर्व दिशा ज्ञान, प्रकाश आणि उर्जेचं प्रतीक असून या दिशेला बाप्पाची स्थापना केल्यास घरात शांती, समृद्धी आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
गणेश चतुर्थी हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर कुटुंब, समाज आणि सकारात्मकतेचा संगम आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती योग्य दिशेला ठेवून श्रद्धा आणि शास्त्र यांचा सुंदर मिलाफ साधला तर घरात वर्षभर बाप्पाची कृपा राहते, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे.