वैदिक पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 17 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा 2 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. तर या तिथीची समाप्ती 19 डिसेंबर 2025 ला सकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी होईल. उदयातिथी आणि निशिता काळ लक्षात घेता या वर्षातील शेवटची मासिक शिवरात्री आणि त्याचं विशेष पूजन आज 18 डिसेंबर 2025 रोजी केलं जाईल.
advertisement
पंचामृत अभिषेक आणि मंत्र जप -
वर्षातील या शेवटच्या मासिक शिवरात्रीला शिवलिंगाचा पूर्ण अभिषेक करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. यासाठी पाण्यात दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल मिसळून पंचामृत तयार करावं आणि ते शिवलिंगावर अर्पण करावं. यासोबतच बेलपत्र, धोतरा आणि पांढरी फुलं वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहावा.
तुमच्या कामात वारंवार अडचणी येत असतील, तर या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पांढऱ्या चंदनानं ओम लिहावं. त्यानंतर शिवलिंगावर एक अभिमंत्रित कवडी अर्पण करावी. पूजा संपल्यानंतर ती कवडी प्रसाद म्हणून आपल्या सोबत घरी आणावी आणि तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवावी. असं केल्यानं कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या वर्षातील शेवटच्या मासिक शिवरात्रीच्या दिवशी 11 बेलपत्रं घ्यावीत. प्रत्येक बेलपत्रावर पांढऱ्या किंवा पिवळ्या चंदनानं ओम नमः शिवाय असं लिहावं आणि ती श्रद्धेनं शिवलिंगावर वाहावीत. हा उपाय गरिबी दूर करणारा मानला जातो.
मासिक शिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच निशिता काळात भगवान शंकराची ऊर्जा सर्वात जास्त जागृत असते. या वेळी मंदिरात किंवा घराच्या देवघरात दिवा लावून आपली विशेष इच्छा महादेवासमोर मांडावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. मासिक शिवरात्रीला असं केल्यानं महादेव लवकर प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतात असं मानलं जातं.
सनातन धर्मात दानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या मासिक शिवरात्रीच्या निमित्तानं गरीब आणि गरजूंना अन्न, पांढरे कपडे किंवा फळांचं दान करावं. तसंच मंदिरात ब्राह्मणांना दान-दक्षिणा द्यावी. असं केल्यानं अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
