TRENDING:

अरे बापरे! माघ पौर्णिमेवर 9 तासाहून अधिक काळ 'भद्रा'चे सावट, नेमकी कोणत्या वेळात करावी पूजा?

Last Updated:

उद्या, 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील ही पौर्णिमा दान, धर्म आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा या पौर्णिमेवर 'भद्रेचे' सावट असल्यामुळे पूजेच्या वेळेबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Magh Purnima 2026 : उद्या, 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील ही पौर्णिमा दान, धर्म आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा या पौर्णिमेवर 'भद्रेचे' सावट असल्यामुळे पूजेच्या वेळेबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्योतिषांनुसार, उद्या पौर्णिमेच्या दिवशी तब्बल 9 तासांहून अधिक काळ भद्रा काळ असणार आहे, ज्यामध्ये शुभ कार्ये करणे वर्ज्य मानले जाते.
News18
News18
advertisement

भद्रा काळ आणि पौर्णिमेचे गणित

पंचांगानुसार, माघ पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारीला पहाटे 05:52 वाजता सुरू होईल. तिथी सुरू होताच भद्रेचाही प्रारंभ होणार आहे, जो दुपारपर्यंत कायम राहील. भद्रा काळ 1 फेब्रुवारी, पहाटे 05:52 ते दुपारी 03:30 पर्यंत राहील. म्हणजे अंदाजे 9 तास 38 मिनिटे भद्रा कालावधी असेल. शास्त्रानुसार, भद्रा काळात कोणतेही मंगल कार्य, नवीन कामाची सुरुवात किंवा विशेष काम्य पूजा करणे टाळले जाते. असे मानले जाते की, या काळात केलेल्या कामात यश मिळण्यास अडथळे येतात.

advertisement

कधी करावी माघ पौर्णिमेची पूजा?

माघ पौर्णिमेला स्नान, दान आणि पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा या दिवशी 'भद्रा' असली तरी तिचा स्नान-दानावर परिणाम होणार नाही. तुम्ही सकाळी ब्रम्हमुहूर्तावर, म्हणजेच सकाळी 05:30 ते सकाळी 07:10 या वेळेत स्नान करू शकता. भद्रा काळातही पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी हे विधी पूर्ण करावेत.

advertisement

पौर्णिमा व्रताची मुख्य पूजा

द्रा काळ दुपारी 03:30 वाजता संपल्यानंतर पूजेसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होईल. तुम्ही दुपारी 03:30 ते सायंकाळी 06:00 पर्यंत व्रताची मुख्य पूजा करू शकता. या काळात तुम्ही सत्यनारायण कथा, लक्ष्मी-विष्णू पूजन किंवा विशेष संकल्प पूर्ण करू शकता.

चंद्रोदय आणि अर्घ्य

पौर्णिमेला चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही सायंकाळी 05:26 वाजता किंवा त्यांनतर पूजा करू शकता. पौर्णिमेला चंद्राची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते. सायंकाळी 5:26 नंतर चंद्राला दुधाचे अर्घ्य देऊन तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करू शकता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापसाच्या दरात मोठी उलथापालथ, सोयाबीन आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
अरे बापरे! माघ पौर्णिमेवर 9 तासाहून अधिक काळ 'भद्रा'चे सावट, नेमकी कोणत्या वेळात करावी पूजा?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल